महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ताडोबा क्षेत्रात वाघानं केलं स्वच्छता कर्मचाऱ्याला ठार; निमढेला प्रवेशद्वाराजवळील घटना

Tiger Attack : ताडोबा अभयारण्याच्या बफर क्षेत्रातील निमढेला गेट जवळ वनकुटी येथे एका स्वच्छता कर्मचाऱ्याला वाघाने ठार केलं. (Death in tiger attack) ही घटना आज (25 जानेवारी) रोजी घडली. रामभाऊ रामचंद्र हनवते (वय 54) असं या मृत स्वच्छता कर्मचाऱ्याचं नाव आहे.

Tiger Attack and killed sanitation worker
वाघाचा हल्ला

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 25, 2024, 6:00 PM IST

चंद्रपूर Tiger Attack : कामावर असताना दबा धरून बसलेल्या वाघाने स्वछता कर्मचाऱ्यावर हल्ला करून त्याला ठार केलं. (sanitation worker death) ही घटना ताडोबा-अंधारी व्याघ्रपकल्पाच्या बफर क्षेत्रात आज (25 जानेवारी) सकाळी घडली. रामभाऊ रामचंद्र हनवते (वय 54) असं या मृत स्वच्छता कर्मचाऱ्याचं नाव आहे. (Tadoba Tiger Reserve)

कंत्राटी तत्त्वावर काम करायचा कर्मचारी :ताडोबा अभयारण्याच्या बफर क्षेत्रातील निमढेला गेट जवळ वनकुटी आहे. येथे स्वच्छता करण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर रामभाऊ हनवते काम करीत होते. त्यांचा मुलगा रणजित हा ताडोबात गाईड म्हणून कार्यरत आहे. पाच महिन्यांपूर्वी रामभाऊ हे कुटीवर स्वछता कर्मचारी म्हणून रुजू झाले होते. आज सकाळी कुटीच्या बाहेर निघून ते कवठाच्या झाडाजवळ उभे असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना समोर आल्यानं एकच खळबळ उडाली.

वाघिणीच्या बछड्यानं शिकार केल्याचा अंदाज :वनविभागाचा चमू घटनास्थळी पोहोचला असताना त्यांना रामभाऊ मृतावस्थेत आढळून आले. सध्या या परिसरात एक वाघीण आणि तिचे बछडे आहेत. हे बछडे आता शिकार करायला शिकत असून त्यापैकी एका बछड्यानं रामभाऊवर हल्ला चढवून त्यांना ठार केलं असावं असा अंदाज आहे. मृतकाच्या कुटुंबाला एक लाख रुपये रोख आणि नऊ लाखांचा धनादेश देण्यात आला. उर्वरित 15 लाखांची रक्कम या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यावर बँकेत जमा करण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी धानकुटे यांनी दिली.

वनकर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर :यापूर्वी देखील गस्तीवर असताना एका महिला कर्मचाऱ्याला वाघाने ठार केलं होतं. यामुळे वनकर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. यानंतर गस्तीवर असताना वन्यजीवांचा हल्ला झाल्यास आत्मरक्षणासाठी काय करायचे याचे प्रशिक्षण दिले गेले होते; मात्र कंत्राटी पध्दतीनं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना असं कुठलंही प्रशिक्षण दिलं गेलं नाही हे विशेष. या हल्ल्याच्या घटनेमुळे कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

हेही वाचा:

  1. सरकारी अधिकाऱ्याच्या घरी 'कुबेराचा खजाना'; 100 कोटींहून अधिक मालमत्ता जप्त
  2. आजपासून रंगणार 'फिरकी' आणि 'बॅझबॉल'मध्ये युद्ध; पहिल्या सामन्यात 'साहेब' करणार फलंदाजी
  3. 'भगवं वादळ' आज धडकणार नवी मुंबईत; तगडा पोलीस बंदोबस्त, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत कसं आहे नियोजन ?

ABOUT THE AUTHOR

...view details