ठाणे Thane Crime News :अंबरनाथमध्ये बिस्किट कंपनीमध्ये 3 वर्षांच्या चिमुरडयाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. अंबरनाथ आनंदनगर भागात असलेल्या एमआयडीसी मधील एकाकंपनीत ही दुर्घटना घडली. बिस्कीट तयार करणाऱ्या मशीनमध्ये अडकून या मुलाचा मृत्यू झाला. आयुष चौहान असं मृत चिमुरड्याचं नाव आहे. याप्रकरणी अंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला.
असा घडला अपघात :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबरनाथ पूर्व येथील आनंद नगर एमआयडीसीजवळील ठाकूर पाडा परिसरातील एका चाळीत आयुष त्याच्या आई-वडिलांसोबत राहत होता. तो मूळचा बिहार राज्यातील असून त्याची आई पूजा कुमारी नितेश चौहान (वय 22) एका बिस्किट कंपनीत 5 ते 6 कामगारांना जेवणाचा डब्बा पुरवते. नेहमीप्रमाणे आज 3 सप्टेंबर रोजी सकाळी त्या आपल्या मुलाला घेऊन बिस्किट कंपनीत डब्बा देण्यासाठी गेल्या. याच दरम्यान मशीनच्या बेल्टवरून बिस्किट एका मागून एक जात असतानाच त्यातील एक बिस्कीट उचलण्यासाठी आयुष्य तिथं गेला. या मशिनच्या बेल्टमध्ये अडकून तो गंभीर जखमी होतो.