मुंबईCompany Fraud In Jharkhand :झारखंड स्थित समृद्धी स्पॉंज लिमिटेड कंपनी आणि एम्मार एम्प्लॉईज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कायदेशीर सल्लागार राजदीप सैनी (वय 63) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष अय्यर, व्ही भास्कर आणि सुधा भालचंद्र पै या तीन आरोपीं विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झारखंड राज्यातील सिंग भूम जिल्ह्यात असलेल्या आदितपूर समृद्धी स्पॉन्स लिमिटेड कंपनी आणि एम्मार एम्प्लॉईज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या दोन कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये लोखंडाचे तुकडे तयार करण्याचं काम केलं जातं. या कंपनीला लोखंडी दगडाच्या कच्च्या मालाची आवश्यकता असते. त्यासाठी शासनाच्या लोखंडी दगडाच्या खाणी मधून माल उचलण्याची परवानगी घेते. मध्यप्रदेश मधील खजुराहो माईन्स आणि मोदी माईन्स तसंच आरोसा या राज्यातील खाणीतून कच्चा माल येतो. कच्चा माल वाहतुकीसाठी कंपनीची ट्रान्सपोर्टरची नेमणूक केली जाते. ट्रान्सपोर्ट कंपन्यांना वर्क ऑर्डर दिली जाते. मोदी माईन्स आणि खजुराहो माईन्स यांचे अंतर झारखंड स्थित कंपनी पासून 18 ते 19 तासांचे आहे. 2021 मध्ये एजंट फहीम खान याने कंपनीचे संचालक सुजित कुमार यांना मुलुरा लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड या कर्नाटकातील कंपनीची ओळख करून दिली. या कंपनीमध्ये मुदतसर मोहम्मद आणि दीपेश कोरंजरथ हे दोन संचालक होते. ही कंपनी ट्रान्सपोर्ट कंपनी असल्याने कंपनीने झारखंड स्थित फसवणूक झालेल्या दोन कंपनीस कच्चामाल पुरवण्यासाठी ट्रान्सपोर्ट पुरवून मोदी माईन्स आणि खजुराहो माईन्स या खाणी मधून माल पुरवण्याचे काम हाती घेतले. एक एग्रीमेंट देखील तयार करण्यात आले होते.
अशा प्रकारे झाली फसवणूक :फसवणूक झालेल्या दोन कंपन्यांनी मुलुरा कंपनीस ऑर्डर दिल्या त्याप्रमाणे मुलुरा कंपनीने झारखंड स्थित कंपनीच्या प्लांटवर माल पुरवण्याचे काम चालू केले होते. त्यासाठी मुलुरा लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने भुवनेश्वर येथील एस के आयलॉजिस्टेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची नेमणूक केली होती. त्यानुसार एस के आय या कंपनीने स्थानिक ट्रान्सपोर्टरची नेमणूक करून फसवणूक झालेल्या कंपनीस माल पुरवण्याचे काम चालू केले होते. झारखंड मधील दोन्ही कंपन्यांकडून मुलुरा कंपनीस वेळच्यावेळी पेमेंट देखील मिळत होते. सुरुवातीला मुलुरा कंपनीने स्थानिक ट्रान्सपोर्टर कंपन्यांना आगाऊ पैसे देऊन त्याचे बिल झारखंड स्थित कंपन्यांना एक महिन्याने पाठवून देत होते. त्यानुसार मुलुरा कंपनीस बिलाप्रमाणे पैसे झारखंड मधील कंपन्या पाठवून देत होत्या.