महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साईंच्या शिर्डीत असा होणार तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव साजरा, भाविकांसाठी मंदिर राहणार रात्रभर खुलं - Gurupurnima Festival Shirdi

Gurupurnima Festival Shirdi : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिर्डी साईबाबा संस्थानच्यावतीनं तीन दिवसीय गुरूपौर्णिमा उत्‍सव साजरा करण्यात येणार आहे. उत्सवाच्या मुख्य दिवशी साई मंदिर रात्रभर खुलं ठेवण्यात येणार असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे.

Gurupurnima Festival Shirdi
साईबाबा संस्थान, शिर्डी (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 18, 2024, 5:40 PM IST

शिर्डी (अहमदनगर)Gurupurnima Festival Shirdi : साईबाबा संस्थानच्यावतीने शनिवार, 20 जुलै ते सोमवार, 22 जुलै 2024 या काळात गुरूपौर्णिमा उत्‍सव साजरा करण्यात येणार आहे. या उत्‍सवाच्या तीन दिवसात तब्बल 6 लाख भाविक साईंच्या दर्शनासाठी येणार असल्याचं साईबाबा संस्थानच्यावतीनं सांगण्यात आलय. साईबाबा हयात असल्यापासून गुरुपौर्णिमा शिर्डीत मोठ्या उत्‍साहात साजरी केली जात आहे. त्‍यामुळे या दिवसाला आजही अनन्‍यसाधारण महत्त्‍व आहे. साईबाबांवर श्रध्‍दा असणारे असंख्‍य भाविक दरवर्षी गुरुपौर्णिमेला शिर्डीला येऊन समाधीचे दर्शन घेतात आणि या उत्‍सवास हजेरी लावतात. याही वर्षी गुरुपौर्णिमा उत्‍सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन साईबाबा संस्थानच्यावतीनं करण्यात आलं आहे.

शिर्डीतील गुरूपौर्णिमा उत्सवाविषयी माहिती देताना मुख्य कार्यकारी अधिकारी (Etv Bharat Reporter)

उत्सवाचा पहिला दिवस :उत्‍सवाच्‍या प्रथम दिवशी शनिवार दिनांक २० जुलै पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती, ०५.४५ वाजता श्रींचे फोटो आणि पोथीची मिरवणूक, ०६.०० वाजता व्‍दारकामाईत श्री साईसच्चरित्राचे अखंड पारायण, ०६.२० वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपूजा, सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० या वेळेत पद्मश्री मदन चव्‍हाण यांचा साईभजन कार्यक्रम, दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती, दुपारी ०१.०० ते ०३.०० या वेळेत भुवनेश नैथानी, दिल्‍ली यांचा साईभजन कार्यक्रम, दुपारी ४.०० ते ६.०० या वेळेत ह.भ.प.श्री मंदार व्‍यास, डोंबिवली यांचा कीर्तन कार्यक्रम, सायंकाळी ०७.०० वा. श्रींची धुपारती, ७.३० ते रात्रौ ९.३० या वेळेत श्री प्रशांत भालेकर, मुंबई यांचा स्‍वरधुनी साईगीतांचा कार्यक्रम, रात्री ०९.१५ वाजता श्रींच्या पालखीची गावातून मिरवणूक होणार आहे. पालखी मिरवणूक परत आल्यानंतर रात्री १०.०० वाजता श्रींची शेजारती होईल. या दिवशी पारायाणासाठी व्दारकामाई मंदिर रात्रभर उघडं राहील.

उत्सवाचा मुख्य दिवस :उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी रविवार दिनांक २१ जुलै रोजी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती, ०५.४५ वाजता अखंड पारायण समाप्ती, श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, ०६.२० वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपूजा, सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० या वेळेत श्री नाना वीर, शिर्डी यांचा साईभजन कार्यक्रम, दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती, दुपारी ०१.०० ते दुपारी ०३.०० या वेळेत संजीव कुमार, पुणे यांचा भजनसंध्‍या कार्यक्रम, सायंकाळी ०४.०० ते ०६.०० या वेळेत ह.भ.प.श्री संतोष पित्रे, डोंबिवली यांचा कीर्तन कार्यक्रम होणार असून सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धूपारती होईल. ७.३० ते रात्रौ १०.०० यावेळेत श्री नीरज शर्मा, दिल्‍ली यांचा भजनसंध्‍याचा कार्यक्रम, रात्री ०९.१५ वाजता श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक निघणार आहे. हा उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडे राहणार असून या दिवशी श्रींची शेजारती व दिनांक २२ जुलै रोजीची पहाटेचे श्रींची काकड आरती होणार नाही. या दिवशी रात्री १०.०० ते पहाटे ०५.०० वाजेपर्यंत इच्छुक कलाकारांचे साईभजन (हजेरी) कार्यक्रम मंदिराशेजारील स्टेजवर होईल.


उत्सवाची सांगता :उत्सवाच्या सांगता दिनी सोमवार दिनांक २२ जुलै रोजी पहाटे ०५.०५ वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ०६.५० वाजता श्रींची पाद्यपूजा, सकाळी ०७.०० वाजता गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक होणार आहे. सकाळी १०.०० ते १२.०० वाजता या वेळेत ह.भ.प.श्री वैभव ओक, डोंबिवली यांचा गोपालकाला कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२.१० चे दरम्‍यान श्रींची माध्यान्ह आरती होणार असून दुपारी ०१.०० ते ०३.०० या वेळेत श्रीमती वनिता बजाज, दिल्‍ली यांचा साईभजन कार्यक्रम होणार आहे. दुपारी ०४.०० ते ०६.०० या वेळेत श्री विरेंद्रकुमार, साई ब्रदर्स, प्रयागराज यांचा मनोहारी भक्‍तीमय भजनांचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. रात्री ०७.३० ते ०९.३० यावेळेत श्री ग्‍यानेश वर्मा, मुंबई यांचा साईराम गुणगान कार्यक्रम होईल. रात्री १०.०० वाजता श्रींची शेजारती होईल.

हेही वाचा:

  1. Shirdi Sai Baba Darshan Pass : भाविकांची होणारी लूट थांबण्यासाठी साई संस्थाननं घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
  2. Shilpa Shetty Sai Baba Darshan : आगामी चित्रपटाच्या यशासाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टी साईचरणी नतमस्तक, पाहा व्हिडिओ
  3. आता साई दर्शनासाठी दररोज 10 हजार भाविकांना मिळणार ऑफलाइन पास

ABOUT THE AUTHOR

...view details