महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिखलदरातील 'भीमकुंड' लाल माकडांपासून झालं मुक्त; 37 माकडांना पकडून सोडलं घनदाट जंगलात - Amravati Monkey News - AMRAVATI MONKEY NEWS

Amravati Monkey News : भीमकुंड परिसरात लाल तोंडाच्‍या माकडांची (Monkey) संख्‍या मोठ्या प्रमाणात वाढली होती. वन विभागाच्‍या कर्मचाऱ्यांनी भीमकुंड परिसरात (Bhimkund) पिंजरे लावून माकडांना बंदिस्‍त केलंय. या मोहिमेत एकूण 37 लाल तोंडाच्या माकडांना पकडून घनदाट जंगलातील निर्मनुष्‍य ठिकाणी सोडण्‍यात आलय.

Amravati News
भीमकुंड लाल माकडांपासून झाला मुक्त (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 3, 2024, 4:03 PM IST

अमरावती Amravati Monkey News :भीमकुंड परिसरात (Bhimkund) येणाऱ्या पर्यटकांवर लाल माकडांकडून हल्ला करण्याच्या घटना गतकाही दिवसांपासून वाढल्या होत्या. 'भीमकुंड' परिसर हा चिखलदरा येथील अतिशय सुंदर पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना लाल माकडांचा त्रास होऊ नये या उद्देशाने, वनविभागाच्या वतीनं सोमवारी आणि मंगळवारी सलग दोन दिवस माकडांना पकडण्याची मोहीम राबवण्यात आली होती.

भीमकुंड लाल माकडांपासून झाला मुक्त (ETV Bharat Reporter)

37 लाल तोंडाच्या माकडांना बंदिस्‍त केलं : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम आदर्श रेड्डी यांच्या मार्गदर्शनात, वन्यजीव विभाग मेळघाटचे विभागीय वन अधिकारी यशवंत बहाळे आणि सहाय्यक वनरक्षक युनाने यांच्या नेतृत्वात परतवाडा आणि गाविलगड येथील विशेष पथकाने या माकडांना पकडले. पिंजऱ्यात अडकलेल्या या 37 माकडांना चिखलदरापासून काही अंतरावर दाट जंगलात बुधवारी सकाळी सोडून देण्यात आले.



आता पंचबोल पॉईंटवर राबवणार मोहीम : भीमकुंड परिसरात लाल माकडांचा बंदोबस्त लावल्यावर आता चिखलदरा येथील 'पंचबोल पॉईंट' परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या लाल माकडांना पकडण्यासाठी शुक्रवारी मोहीम राबविली जाणार आहे. यामुळं शुक्रवारी 'पंचबोल पॉईंट' परिसर पर्यटकांसाठी बंद राहील असं यशवंत बहाळे यांनी सांगितलं.


सेमाडोह, कोलकास परिसरातही लाल माकडांचा धुमाकूळ : चिखलदरा येथील विविध पर्यटनस्थळांवर लाल माकडांचा पर्यटकांना त्रास होत असतानाच, मेळघाटातील सेमाडोह आणि कोलकास या दोन पर्यटनस्थळांवर देखील लाल माकडांचा धुमाकूळ चालू आहे. विशेष म्हणजे घाटापासून सीमाडोहकडे जाताना मोठ्या संख्येने लाल माकडे रस्त्यावर अगदी वाहनासमोर येतात. काही पर्यटक या माकडांना खायला देतात. त्यामुळं या रस्त्यावर माकडांचा त्रास वाढलाय. या माकडांना काहीही खायला देऊ नये अन्यथा दंड आकारण्यात येईल असे फलक मार्गात जागोजागी लावले आहेत. तरीही काही पर्यटक या सूचनेकडं दुर्लक्ष करतात. यामुळंच या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या समोर लाल माकडे उड्या मारतात.

हेही वाचा -

  1. डरकाळी फोडत आला वाघ: मेळघाटच्या जंगलात पर्यटकांनी अनुभवला थरार; व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा - Melghat Tiger Reserve
  2. मेळघाटात गवळी बांधवांची घरवापसी; गुरांना चारा, पाणी मिळावं यासाठी सहा महिन्यासाठी केलं होतं स्थलांतर - CATTLE OWNERS RETURNED IN MELGHAT
  3. मेळघाटात व्याघ्र दर्शन; कोलकास- सेमाडोह परिसरात पर्यटकांनी अनुभवला थरार

ABOUT THE AUTHOR

...view details