महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साईंच्या शिर्डीत देशातील सर्वात मोठे मंडपनचे साहित्य प्रदर्शन; तीन दिवसांत तब्बल 'एवढ्या' कोटींहून अधिकची उलाढाल - SHIRDI MANDAPAM EXPO

मंडपन संघटनेची स्थापना करण्यात आल्यानंतर पहिले अधिवेशन शिर्डीत आयोजित करण्यात आले होते. यानंतर मुंबई , कोल्हापूर आणि शिर्डीत अधिवेशन घेण्यात आले होते

Shirdi Mandapam Expo
साईंच्या शिर्डीत देशातील सर्वात मोठे मंडपनचे साहित्य प्रदर्शन (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : 19 hours ago

Updated : 19 hours ago

शिर्डी-देशातील दोन नंबर आणि राज्यातील एक नंबरचे देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत देशातील सर्वात मोठं मंडप आणि डेकोरेशन व्यावसायिकांचं तीन दिवसीय साहित्याचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. या तीन दिवसांत 150 कोटींहून अधिकची उलाढाल झाल्याची माहिती मंडपन संघटनेचे अध्यक्ष दगडू पुरोहित यांनी दिलीय. राज्यातील मंडप आणि डेकोरेशन व्यावसायिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत असल्याने सर्व व्यावसायिकांना एका छताखाली आणून मंडपन संघटनेची गेल्या पाच वर्षांपूर्वी स्थापना केलीय. या संघटनेची स्थापना करण्यात आल्यानंतर पहिले अधिवेशन शिर्डीत आयोजित करण्यात आले होते. यानंतर मुंबई , कोल्हापूर आणि शिर्डीत अधिवेशन घेण्यात आले होते. मंडपनचे यंदाचे चौथे प्रदर्शन शिर्डीत पार पडलंय.

Shirdi Mandapam Expo (Source- ETV Bharat)

देशभरातून 27 हजार मंडपन व्यावसायिकांची भेट : मंडप आणि डेकोरेशन व्यावसायिकांच्या देशातील सर्वात मोठ्या चौथ्या प्रदर्शनाचे शिर्डीत आयोजन करण्यात आले होते. तीन दिवसांत देशभरातील तब्बल 27 हजार मंडपन व्यावसायिकांनी या प्रदर्शनाला भेट दिलीय. देशभरातील चारशेहून अधिक मंडप आणि डेकोरेशन व्यावसायिकांनी स्टॉल लावले असून, ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या प्रदर्शनात तब्बल 150 कोटींवर उलाढाल झाल्याची माहिती मिळालीय.

Shirdi Mandapam Expo (Source- ETV Bharat)

मंडपन संघटनेची गेल्या पाच वर्षांपूर्वी स्थापना : विवाह सोहळे, धार्मिक कार्यक्रम असो किंवा राजकीय कार्यक्रम मंडप आणि डेकोरेटर्स यांच्याशिवाय ते कार्यक्रम पूर्णच होत नाहीत. इतक्या महत्त्वपूर्ण बनलेल्या या व्यावसायिकांना आजही अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे राज्यातील मंडप आणि डेकोरेशन व्यावसायिकांना एका छताखाली आणून मंडपन संघटनेची गेल्या पाच वर्षांपूर्वी स्थापना करण्यात आली. या संघटनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून अनेक अडचणी सोडून घेतल्यात. मात्र अजूनही अनेक अडचणी असल्याने त्याही सरकारने सोडवाव्यात, अशी मागणी यावेळी मंडपन संघटनेच्या वतीने करण्यात आलीय.

मंडपन संघटनेचे अध्यक्ष दगडू पुरोहितांनी दिलेली माहिती (Source- ETV Bharat)

व्यावसायिकांना गोडाऊनची मोठी अडचण :मंडप आणि डेकोरेशन व्यावसायिकांना गोडाऊनची मोठी अडचण येतेय. एमआयडीसीमध्ये जमीन मिळावी तसेच मोठ्या शहरात पोलीस प्रशासन आणि आरटीओ अधिकाऱ्यांकडून आम्हाला त्रास होत असल्याने अत्यावश्यक व्यवसायात आमचा मंडपन व्यवसाय रुजू करावा, अशा अनेक मागण्या यावेळी मंडपन संघटनेच्या वतीने करण्यात आल्यात.

हेही वाचा :

  1. भाजपा लोकशाहीच्या मुळावर उठलेला पक्ष; अरविंद केजरीवालांना देशद्रोही ठरवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न चुकीचा, संजय राऊतांचा हल्लाबोल
  2. तुम्ही अर्बन नक्षलवाद्यांचे कमांडर; संजय राऊतांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका, आयोगावर बोलताना जीभ घसरली
Last Updated : 19 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details