महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला महिलेनं शिकवला धडा, उलतण्यानं हल्ला केल्यानं नराधमाच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर जखम - Thane Crime News

Thane Crime News : ठाण्यातून एक धक्कादायक घटना पुढं आली आहे. एका नराधमानं दारूच्या नशेत विवाहित महिलेच्या घरात घुसून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. रक्षणासाठी पीडितेनं उलतण्यानं आरोपी नराधमाच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला करून गंभीर जखमी केलं.

Thane Crime News
महिलेवर अत्याचार (ETV Bharat प्रतिकात्मक छायाचित्र)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 18, 2024, 3:39 PM IST

ठाणे Thane Crime News :एका 31 वर्षीय नराधमानं दारुच्या नशेत 26 वर्षीय विवाहित महिलेच्या घरात घुसून तिच्यावर बळजबरीनं अत्याचार करत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेनं स्वरक्षणासाठी नराधमाच्या प्रायव्हेट पार्टवर उलतण्यानं हल्ला केला. ही घटना भिवंडी शहरातील धामणकर नाका परिसरातील एका इमारतीत घडली.

याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून नराधमावर भिवंडी शहर पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल सत्यनारायण रच्चा (३१) असे गुन्हा दाखल झालेल्या नराधमाच नाव आहे. आरोपी हा पीडित महिलेच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आरोपी गंभीर जखमी : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडिता एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यातच १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास नराधम अनिल दारूच्या नशेत पीडित तक्रारदार महिलेच्या राहत्या घरी गेला. त्यानंतर पीडिता घरी एकटी असल्याचं पाहून तिला शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. नराधम तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करू लागला. या घडलेल्या प्रकारानंतर पीडित महिलेनं घाबरलेल्या अवस्थेत घरातच आरडाओरड केला. घरातील स्वयंपाक खोलीत आपली अब्रू वाचविण्यासाठी गेली. हा नराधम त्यावेळी स्वयंपाक खोलीत लगट करतानाच स्वरक्षणासाठी पीडितेनं उलतण्यानं आरोपी नराधमाच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला. या हल्ल्यात नराधमाच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर जखम झाली.

आरोपी अटक :हल्ल्यात नराधमाच्या प्रायव्हेट पार्ट गंभीर जखम झाल्यानं त्याच्यावर भिवंडीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून नराधमावर भिवंडी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ७४,७५(१)(२) सह ३३३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पोलीस उपनिरीक्षक भवर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आरोपीवर पोलीस बंदोबस्तात रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं सांगितलं. उपचारातून बरा झल्यानंतर त्याला अटक करून न्यायालयात हजर करणार येईल असल्याची त्यांनी माहिती दिली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भवर करीत आहेत.

हेही वाचा

  1. शाळेच्या शौचालयात दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार, 23 वर्षीय नराधमाला ठोकल्या बेड्या - Thane Rape News
  2. धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर 73 वर्षीय नराधमाचा बलात्कार, न्यायालयानं ठोठावली पोलीस कोठडी - 73 Year Old Man Raped Minor Girl

ABOUT THE AUTHOR

...view details