ठाणे Drug accused arrested: ठाणे गुन्हे शाखा युनिट-5 च्या पथकानं साठ किलो गांजा तसंच हॅश ऑइलसह 4 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी अभिजित अविनाश भोईर (29), पराग नारायण रेवंडकर(31), मामा उर्फ सुरेंद्र बाबुराव अहिरे (54) आणि राजू हरिभाऊ जाधव (40) या चारजणांना पोलिसांनी अटक केलीय. गुन्हे शाखा युनिट-5 च्या पथकानं अमली पदार्थ विरोधी कारवाईत (चरस) हॅश ऑइल देखील जप्त केलंय. हस्तगत केलेल्या हॅश ऑईलची किंमत बाजारात 1 कोटी 83 लाख 34 हजार 980 रुपये असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.
60 किलो 500 ग्राम गांजा जप्त :गुन्हे शाखा युनिट-5 च्या पथकानं गोपनीय माहितीच्या आधारे ठाण्याच्या वागळे इस्टेट इंदिरानगर परिसरात गांजा विक्रीसाठी आलेला आोरीपी ऋषभ भालेराव (28)याला अटक करून त्याच्या घरातून 60 किलो 500 ग्राम गांजा जप्त केलाय. या गांजाची एकूण किंमत 31 लाख 2 हजार 200 रु आहे. याव्यतिरिक्त 290 ग्राम चरस, 19 छोट्या चरस (हॅश)ऑइल असा मुद्देमाल पोलीस पथकानं हस्तगत केला. या प्रकरणात हॅश ऑईलची विक्री इन्स्टाग्रामवर होत असलयाचं समोर आलंय. आरोपी भालेराव यानं चौकशीत दिलेल्या माहितीवरून पोलीस निरिक्षक विकास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
1 किलो 380 ग्राम हॅश ऑइल हस्तगत :या प्रकरणात पोलीस पथकानं आरोपी अभिजित अविनाश भोईर आणि आरोपी पराग नारायण रेवंडकर(31) यांना 20 फेब्रुवारी रोजी अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला. हे दोघे ऋषभ संजय भालेरावला माल पुरवीत होते. आरोपींनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आरोपी मामा उर्फ सुरेंद्र बाबुराव अहिरे(54), राजू हरिभाऊ जाधव(40) रा, दोघेही मनमाड ता-नांदगाव, जि. नाशिक, यांना 23 फेब्रुवारी, 2024 रोजी अटक केली होती. त्यावेळी आरोपी मामा उर्फ सुरेंद्र यांच्याकडून 12 लाख 70 हजार 700 रुपयांच्या किमतीचे हॅश ऑइल हस्तगत करण्यात आलं होतं. तसंच आरोपी राजू जाधव यांच्याकडून 1 कोटी 38 लाख रुपये किमतीचे 1 किलो 380 ग्राम हॅश ऑइल हस्तगत केलं होतं.