महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दादर सुटकेस प्रकरणानंतर पुन्हा लगेज बॅगमध्ये आढळला मृतदेह, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू - Thane Crime News - THANE CRIME NEWS

Body found in Kalyan Nagar road : कल्याण-नगर रस्त्यावरील वरप गावातील गावदेवी मैदानाशेजारील कचराकुंडीत एका वृद्धाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास सुरू केला आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 15, 2024, 8:43 PM IST

ठाणे Body found in Kalyan Nagar road : दादर रेल्वे स्थानकात एका पिशवीत मृतदेह सापडल्याची घटना ताजी असतानाच कल्याणजवळील कचऱ्याच्या ढीगात एका वृद्ध इसमाचा मृतदेह पोत्यात सापडल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. कल्यान-नगर मार्गावर वरप गावातील गावदेवी मैदानाशेजारील कचराकुंडीत ही घटना घडलीय. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कल्याण ग्रामीण पोलीस ठाण्यात खूनासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केलाय.

महेश गोधंळे यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

कचऱ्यात आढळला मृतदेह : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास कल्याण-मुरबाड मार्गावरील वरप गावात खुल्या भूखंडावरील कचरा पट्टीत एका वयोवृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळला. हा मृतदेह एका निळा रंगाच्या (लगेज) बॅगेत होता. भूखंडावर पसरलेल्या कचऱ्यात ही बॅग पडली होती. लघुशंका करण्यासाठी आलेल्या तरुणाला ही बॅग दिसली होती. त्यानं बॅग उघडली असता त्याला बॅगेत मृतदेह असल्याचं निदर्शनास आलं. याबाबत त्यांनं तात्काळ कल्याण ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती दिली.

घटनेचा कसून तपास : घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आला. घटनेचं गांभीर्य ओळखून ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी, उप पोलीस अधीक्षक जगदीश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाबाबत मार्गदर्शन केलं. तसंच या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आतापर्यंत परिसरातील तसंच कल्याण- मुरबाड मार्गावरील शंभरहून अधिक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले आहेत. घटनास्थळी श्वानपथकानं, ठाणे गुन्हे शाखेचे पथक तसंच कल्याण ग्रामीण पोलीस पथकानं मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी परिसरात तपास सुरू केलाय, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी दिलीय.

हेही वाचा-

  1. सख्खा मित्र पक्का वैरी; कुख्यात गुंड हाजी सरवर शेख हत्याकांडात धक्कादायक माहिती आली पुढं, 'या' कारणातून मित्रानंच केला खून - Gangster Haji Sarwar Shaikh Murder
  2. रिक्षाच्या भाड्यावरून मित्राची हत्या, UP ला पळून जाणाऱ्या आरोपीला अटक - Mumbai Crime

ABOUT THE AUTHOR

...view details