महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलीस ठाण्याच्या इन्चार्जसह हवालदारावर लाचखोरीचा गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण? - THANE CRIME

लाचखोरीच्या प्रकरणात थेट पोलीस निरीक्षकांसह पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल झाला आहे. जाणून घ्या, सविस्तर माहिती.

Thane crime
लाचखोरी गुन्हा (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 5, 2025, 11:44 AM IST

ठाणे - पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांसह पोलीस हवालदारानं दोन लाखांची लाच मागितल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ठाणे जिल्ह्यातील मुरबाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. विशेष म्हणजे पोलीस ठाण्याचा इन्चार्ज म्हणून असलेल्या अधिकाऱ्यावरदेखील गुन्हा दाखल झाला.

मुरबाड पोलीस ठाण्यात (इन्चार्ज) पोलीस निरीक्षकांसह पोलीस हवालदारावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७, ७ (अ ) १२ नुसार गुन्हा दाखल झाला. त्यामुळे पोलीस दलात या लाचखोरीच्या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. मनोज कामत असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस ठाण्याच्या इन्चार्जचं नाव आहे. तर सचिन उदमले असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचं नाव आहे.



मिळालेल्या माहितीनुसार काही महिन्यांपुर्वीच पोलिस अधिकारी मनोज कामत हे पोलीस निरीक्षक ( इन्चार्ज) म्हणून मुरबाड ग्रामीण पोलीस ठाण्यात रुजू झाले होते. तर पोलीस अंमलदार सचिन उदमले हेही याच पोलीस ठाण्यात कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. हे दोघेही कार्यरत असताना बदलापूर शहरात राहणाऱ्या एका महिलेनं मुरबाड पोलीस ठाण्यात १० डिसेंबर २०२४ रोजी दिली. तक्रारीनुसार एका व्यक्तीविरोधात लग्नाचं आमिष दाखवून महिलेची १० ते १२ लाख रुपये रुपये घेऊन फसवणूक करण्यात आली होती.



लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार मुरबाड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी सचिन उदमले यांनी तक्रारदाराला त्या महिलेनं केलेल्या तक्रार अर्जाबाबत फोनद्वारे सांगितलं. ज्याच्याविरोधात महिलेनं तक्रार दिली, त्या व्यक्तीनं त्याच्या नातेवाईकाला माहिती दिली. त्याच्या नातेवाईकांनी मुरबाड पोलीस ठाण्यात कर्मचारी सचिन उदमले यांची भेट घेतली. जर प्रकरण मिटवायचे असेल तर मला आणि मनोज कामत यांना २ लाख रुपये दयावे लागतील तरच हे प्रकरण मिटेल, अशी भीती पीडित व्यक्तीच्या नातेवाईकाला दाखविली.


पीडितच्या नातेवाईकानं एसीबीकडं दिली तक्रार-१२ आणि १४ डिसेंबर रोजी पोलीस अंमलदार सचिन उदमले यांनी तक्रारदाराला वारंवार मोबाईलवर संपर्क साधून पैशाची मागणी सुरुच ठेवली होती. त्यामुळे आपल्या नातेवाईकाविरोधात काही तरी कटकारस्थान होत असल्याचं त्यांच्या लक्षात आले. तसेच पैसे उकळण्याचा डाव असल्याचं त्यांना समजले. त्यानुसार पीडित व्यक्तीच्या नातेवाईकानं १६ डिसेंबर २०२४ रोजी अँन्टी करप्शन ब्युरो (ACB) ठाणे यांच्याकडे तक्रार दाखल केली. पोलीस अधिकारी मनोज कामत हे आमच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार दिली.



पोलीस तपासात काय आलं समोर?ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या महिला पोलीस अधिकारी अनुपमा खरे यांनी तक्रारदारासोबत काही शासकीय कर्मचारी असलेले पंच दिले. तसेच डिजीटल व्हाई रेकॉर्डद्वारे चाचपणी सुरू केली. त्यानुसार कामत आणि सचिन उदमले हे पैसे मागत असल्याचं काही पंचासमक्ष आणि डिजीटल व्हाईस रेकॉर्डद्वारे तपासणी मार्फत दोन लाखांची लाचेची मागणी केल्याचं तपासात समोर आलं. त्यानंतर ३१ डिसेंबर रोजी या दोघांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार तसेच मिळालेल्या अधिकाराचा दुरुपयोग केल्याप्रकरणात पीडितच्या तक्रारीवरून मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हाचा तपास ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या महिला पोलीस अधिकारी अनुपमा खरे करीत आहेत.

हेही वाचा-

  1. ठाण्यानंतर पुण्यातही हिंदी-मराठी वाद, मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला बेदम चोप
  2. गॅंगवॉरमध्ये पवन हिरणवारचा मृत्यू; पोलिसांनी केली चार आरोपींना अटक, भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी शेखुने रचला प्लॅन

ABOUT THE AUTHOR

...view details