अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया (Etv Bharat Reporter Mumbai) मुंबई Lok Sabha Election 2024:दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ हा वरळी भायखळा, मलबार हिल शिवडी, कुलाबा, गिरगाव या विधानसभा मतदारसंघांचा मिळून तयार झाला आहे. या लोकसभा मतदारसंघांमध्ये गुजराती, मराठी, अल्पसंख्याक, उच्चभ्रू लोकवस्ती आहे. त्यामुळं या मतदारसंघात जनता आपल्याला निवडून देईल, असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभा उमेदवार अरविंद सावंत यांनी व्यक्त केला आहे.
दक्षिण मुंबईतील समस्या सोडवणार :दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ अतिशय दाट लोकवस्तीचा मतदार संघ आहे. त्यामुळं या मतदारसंघांमध्ये जुन्या इमारतींच्या विकासाचा प्रश्न, शिवडी येथील बिडीडी चाळ पुनर्विकासाचा प्रश्न, गिरण्यांच्या जमिनीचा प्रश्न, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याचा प्रश्न, तसंच कामाठीपुरासारख्या विभागातील रखडलेल्या क्लस्टर योजनेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण केंद्रीय स्तरावर निश्चितपणे प्रयत्न करू अशी, ग्वाही यावेळी बोलताना अरविंद सावंत यांनी दिली.
जुन्या चाळींचा विकास करणार : या परिसरातील अनेक जुन्या चाळींचा विकास करताना काही अडचणी समोर येणार आहेत. यापैकी महत्त्वाचं म्हणजे मालक आणि भाडेकरू यांच्यातील वाद. मालकांना बाजूला ठेवून भाडेकरूंचा कसा विकास करता येईल, असा प्रश्न न्यायालयानं नुकताच उपस्थित केला आहे. मात्र, जर मालकांना विकासामध्ये रसच नसेल तर, भाडे करून मी त्यांच्या विकासाबाबत विचार करायला काहीही अडचण नाही. याबाबतचा एक कायदाच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्या कायद्यानुसार येथील भाडे करूनच्या विकासासाठी न्यायालयाचा आदेश मानत प्रयत्न केला जाईल, असंही सावंत यांनी सांगितलं.
बेरोजगारी, उद्योगांचा प्रश्न महत्त्वाचा :बेरोजगारी, उद्योगाचा प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. मुंबईमधील रोजगार मुंबई बाहेर पळवले जात आहेत, अशा वेळेस मुंबईतील मराठी माणसाला त्याचा रोजगार मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं सावंत यांनी सांगितलं. तर हा आपला पारंपरिक मतदार संघ असून या मतदार संघातील अल्पसंख्यांक, दलित सर्वच मतदार आपल्यासोबत आहेत. तसंच खरी शिवसेना कोणाची ही इथल्या मतदाराला चांगलं माहित आहे. त्यामुळं आपला विजय निश्चितच होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
हे वाचलंत का :
- अमित शाहांपासून नारायण राणेंपर्यंत उद्धव ठाकरेंची चौफेर फटकेबाजी; नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर - Uddhav Thackeray Speech
- काँग्रेसची सत्ता आल्यास मराठा आणि धनगरांना आरक्षणात वाटा मिळेल; राहुल गांधींचं आश्वासन - Lok Sabha election
- उत्तर मध्य मुंबईत आता होणार तिरंगी लढत, एमआयएमनं अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दिला उमेदवार - lok sabha election 2024