महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिक्षकानं विद्यार्थिनीला केले अश्लील मेसेज; अन् गुन्हा दाखल झाला मुख्याध्यापकावर - Teacher Obscene Messages To Girl - TEACHER OBSCENE MESSAGES TO GIRL

Teacher Obscene Messages To Girl : शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकानंच विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. मात्र या प्रकरणात पोलिसांनी शिक्षकासह शाळेच्या मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मुख्याध्यापकाला ताब्यात घेतलं आहे.

Teacher Obscene Messages To Girl
प्रतिकात्मक छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2024, 7:23 AM IST

पुणे Teacher Obscene Messages To Girl :शाळेतील शिक्षकानं नात्याला काळिमा फासत विद्यार्थिनीला अश्लील मेसेज केल्यानं खळबळ उडाली. ही घटना दौंडमधील एका शाळेत घडली असून नराधम शिक्षकानं विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवल्यानं संताप व्यक्त करण्यात येत आहे. बापूराव धुमाळ असं त्या विद्यार्थिनीला अश्लील मेसेज करणाऱ्या शिक्षकाचं नाव आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी त्या शिक्षकासह शाळेच्या मुख्याध्यापकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली आहे. हा प्रकार दौंडमध्ये 22 ऑगस्टला उघडकीस आला आहे.

दौंड पोलीस ठाणे (Reporter)

शिक्षकानं विद्यार्थिनीला केले अश्लील मेसेज :दौंड तालुक्यातील एका गावातील शाळेत बापुराव धुमाळ हा शिक्षक शिकवत होता. त्यानं आपल्याच शाळेतील विद्यार्थिनीला अश्लील मेसेज केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित विद्यार्थिनीनं या प्रकराची माहिती तिच्या वडिलांना दिली. विद्यार्थिनीला शाळेतील शिक्षकानंच अश्लील मेसेज केल्यानं विद्यार्थिनीच्या वडिलांना मोठा धक्का बसला. त्यांनी तत्काळ शाळा गाठून त्या शिक्षकाला जाब विचारला. विद्यार्थिनीला शिक्षकानं अश्लील मेसेज केल्यामुळे संतप्त ग्रामस्थ या शाळेत दाखल झाले. यावेळी पालकांनी सदर शिक्षकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी काहीवेळ शाळेत तणाव निर्माण झाला.

दौंड पोलीस ठाण्यातील जवानांनी घेतली शाळेत धाव :विद्यार्थिनीला शिक्षकानं अश्लील मेसेज केल्यानं संतप्त झालेले पालक शाळेत धडकले. त्यामुळे शाळेत तणाव पसरला. त्यामुळे याबाबातची माहिती दौंड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी देण्यात आली. त्यामुळे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी आपल्या ताफ्यासह तत्काळ घटनास्थळ गाठून तणावावर नियंत्रण मिळवलं. विद्यार्थिनीला अश्लील मेसेज केल्याप्रकरणी बापुराव धुमाळ या शिक्षकासह शाळेचे मुख्याध्यापक सुभाष वाखारे यांच्यावरही 22 ऑगस्टला गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.

मुख्याध्यापकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात :बापुराव धुमाळ या शिक्षकानं व्हाँट्सअप व्हिडिओ कॉल आणि इतर साधनांचा वापर करुन अनेक मुलींशी अश्लील वागणूक केल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होत आहे. शाळेतील शिक्षक बापुराव धुमाळ आणि मुख्याध्यापक सुभाष वाखारे या दोघांवर कडक कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून बापुराव धुमाळ या शिक्षकाला अटक करण्यासाठी पोलीस पथक पाठवली असून शाळेचे मुख्याध्यापक सुभाष वाखारे यांना ताब्यात घेतल्याची माहिती दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली. या प्रकरणाची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक संतोष डोके, पोलीस उपनिरीक्षक सतीश राऊत आणि पथक पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा :

  1. कोल्हापूर हादरलं! बिहारी जोडप्याच्या अल्पवयीन मुलीची हत्या, मामानेच अत्याचार करून खून केल्याचा पोलिसांचा अंदाज - MINOR GIRL MURDER
  2. सोशल माध्यमांवर झाली ओळख : नराधमानं गुजरातमध्ये नेऊन 13 वर्षीय बालिकेवर केला बलात्कार - Social Media Friend Raped Girl
  3. मुंबईकरांचा पुन्हा संताप; नराधमाकडून दोन चिमुकल्या मुलींचा विनयभंग, विवस्त्र होत अत्याचाराचा प्रयत्न - Girl Abused In Mumbai

ABOUT THE AUTHOR

...view details