महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

TISS च्या 100 कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड; तडकाफडकी नोकरीवरुन काढलं - TISS Employees were fired - TISS EMPLOYEES WERE FIRED

TISS Employees fired : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील (TISS) 100 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं आहे. यामध्ये शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळं शंभर कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली असून उपासमारीची वेळ आली आहे.

TISS Employees fired
TISS कर्मचाऱ्यांची हकालपट्टी (Etv Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 30, 2024, 3:51 PM IST

मुंबईTISS Employees Fired :टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (TISS) च्या 100 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी नोकरीवरुन हटवण्यात आलं आहे. यामध्ये शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 29 जून रोजी 100 कर्मचाऱ्यांना त्यांच्या रोजगार कराराचं नुतनीकरण केलं जाणार नाही, असं सांगण्यात आलंय. टाटा एज्युकेशन ट्रस्टकडून नियमित निधी न मिळाल्याचं कारण देत या कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी केलंय. तसंच सर्व कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

निधी नियमित मिळत नसल्याचं कारण : टाटा एज्युकेशन ट्रस्टकडून अगोदर नियमित मिळणारा निधी आता नियमित मिळत नसल्याचं कारण सांगत, या 100 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं आहे. 29 जून रोजी TISSनं कर्मचाऱ्यांना आता नोकरीच्या कराराचं नुतनीकरण करण्यात येणार नसल्याचं कारण देत कामावरुन कमी केलं. व्यवस्थापनानं १०० कर्मचाऱ्यांना तशा पद्धतीचे मेल केले. तसंच त्यांच्या हाती नोकरीवरुन काढून टाकणारी पत्रं ठेवली.

आम्हाला पुन्हा कामावर रुजू केलं जाईल :काढून टाकण्यात आलेल्या पैकी अनेक कर्मचारी हे 2008 पासून TISS मध्ये कार्यरत आहेत. यांनी विविध अभ्यासक्रम, संशोधन प्रकल्पसुद्धा राबवले आहेत. त्यांचे प्रकल्प अजूनही सुरू असताना त्यांना कामावरुन काढण्यात आलं आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये 60 शिक्षक, उर्वरीत 40 शिक्षकेतर कर्मचारी आहेत. गेले अनेक महिने आमच्या या प्रश्नाबाबत टाटा ट्रस्टच्या अधिकाऱ्यांशी येथील लोकांनी सतत पाठपुरावा केला. परंतु आमच्या पगाराचं पैसे मिळण्यास अनेक अडचणी आल्या. तसंच मागील महिन्याचा पगारही 'टीस'च्या राखीव निधीतून आम्हाला करण्यात आला होता. अखेर नाईलाजास्तव कंपनीनं आम्हाला कामावरुन कमी केलं. परंतु याबाबत आमचा लढा सुरू राहील. टाटा एज्युकेशन ट्रस्ट कढून नियमित स्वरुपात निधी पुन्हा उपलब्ध केला जाण्याची शक्यता असून आम्हाला पुन्हा कामावर रुजू केलं जाईल असं, 'टीस'च्या एका कर्मचाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं. याबाबत टीसच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न केला, परंतू संपर्क होऊ शकला नाहीय.

हे वाचलंत का :

  1. "अर्जुनाला जसा डोळा दिसत होता, तसं..." शरद पवारांचं निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य - SHARAD PAWAR News
  2. मी कुठेही जाणार नाही, मी एकनाथ शिंदेंसोबतच - गोपीकिशन बाजोरिया यांचा खुलासा - Gopikishan Bajoria
  3. उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या चित्रामुळेच... देवेंद्र फडणवीसांना संजय राऊतांचं जोरदार प्रत्युत्तर - Sanjay Raut News

ABOUT THE AUTHOR

...view details