महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तारकर्ली समुद्रकिनारा रेड झोन घोषित, सरपंचासह ग्रामस्थांचे रोजगारासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन - Oros Collectorate

Tarkarli beach declared red zone : तारकर्ली समुद्रकिनारा रेड झोन घोषित केल्यानं ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळं ग्रामस्थांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बुधवारी उपोषण केलं.

Tarkarli beach declared red zone :
Tarkarli beach declared red zone :

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 7, 2024, 10:01 AM IST

सरपंच मृणाली मयेकर यांची प्रतिक्रिया

सिंधुदुर्गTarkarli beach declared red zone :तारकर्ली समुद्रकिनारा सध्या जगभरातील पर्यटकांसाठी रेड झोन बनल्यानं तारकर्ली ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यामुळं तारकर्ली ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. तारकर्ली बीच हा रेड झोन असल्याचं बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना सांगितलं. त्यामुळं पर्यटन व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करेले.

माहिती देण्यास टाळाटाळ :ग्रामपंचायतीनं मागितलेली माहिती देण्यास प्रशासन टाळाटाळ करत आहेत. प्रशासनाच्या या कारभाराविरोधात तारकर्ली-कालेथर ग्रामपंचायत सरपंचासह ग्रामस्थांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. जानेवारी 2023 पासून आतापर्यंत मालवण तालुक्यातील तारकर्ली-कालेथर ग्रामपंचायतीनं प्रशासनाला अनेक पत्रव्यवहार करून आवश्यक माहिती मागवली आहे. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे तारकर्ली कालेथर ग्रामपंचायतचे सरपंच मृणाली मयेकर, ग्रामपंचायत सदस्या अनघा कुबल, तन्वी मेस्त्री, स्नेहाली केळुसकर, प्रेरणा सावंत, तसेच ग्रामस्थ विष्णू मेनेस्त्री, गजानन कुबल, भिवाजी कोळबकर, पराचंद्र केळू आणि पराकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं आहे.

रेड झोनमध्ये केव्हा घोषित झाला : तारकर्ली एमटीडीसी समुद्रकिनारा रेड झोनमध्ये केव्हा घोषित करण्यात आला? त्यांच्या शासन निर्णयाची प्रत तसंच त्यांनी स्थानिक प्रशासनाला दिलेल्या लेखी पत्राची प्रत आम्हाला द्यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. तारकर्ली रेड झोन क्षेत्र असल्यास पर्यटकांना समुद्रात जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती द्यावी, अशी ग्रामस्थांनी मागणी केली. याबाबत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डानं काय कारवाई केली?, 1 जानेवारी 2023 पासून आतापर्यंत ग्रामपंचायतींनी केलेल्या पत्रव्यवहारावर प्रशासनानं केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यात यावी, इत्यादी मागण्या ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत. ग्रामपंचायतीनं मागितलेली माहिती प्रशासनाकडून वेळेत दिली जात नाही. त्यामुळं ग्रामस्थांनी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. तसंच प्रशासनाच्या कार्यपद्धतीविरोधात तारकर्ली येथील ग्रामस्थांनी निषेध नोंदवला आहे.

हे वचालंत का :

  1. Malvan Tarkarli Beach : तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनास गेलेल्या मित्रांवर काळाचा घाला; तिघेजण बुडाले, दोघांना वाचवण्यात यश, एक अद्याप बेपत्ता
  2. Beach Tourism : कोकण किनारपट्टीच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनाला चालना देण्यासाठी समुद्र कुटी उभारण्याचा सरकारचा निर्णय
  3. Green Sea Tortoise : महाराष्ट्रातील पहिल्या संरक्षित घरट्यातून कासवाची ७४ पिल्ले तारकर्ली समुद्रात उतरली

ABOUT THE AUTHOR

...view details