मुंबई Nana Patole OnCricketer Bus: भारतीय क्रिकेट संघाने ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल तेरा वर्षानंतर विश्वचषक (T20 World Cup 2024) जिंकला आहे. 17 वर्षानंतर टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आहे. बार्बाडोस येथे अंतिम चुरशीच्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात धावानी पराभव केला. त्यामुळं देशात विजयाचा जल्लोष अजूनही सुरू आहे. दरम्यान, आज भारतीय टीमचे मुंबईत आगमन होत आहे. मरीन ड्राईव्ह (Marine Drive) ते वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium) असे विश्वविजेता खेळाडूंची मिरवणूक काढून त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. ज्या बसमधून खेळाडूंचे मिरवणूक काढण्यात येणार आहे. ती बस गुजरातमधून मागवण्यात आल्यामुळं विरोधकांनी यावरून सरकारवर निशाणा साधला आहे.
बेस्टची सोय करायला हवी होती :2007 रोजी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पहिला टी-ट्वेंटी वर्ल्डकप भारताने जिंकला होता. त्यावेळी खुल्या बसमधून भारतीय संघाशी मिरवणूक काढण्यात आली होती. मात्र, आता जी बस मागवली ती गुजरातमधून मागवली आहे. मात्र मिरवणुकीसाठी मुंबईची बेस्ट बस वापरायला हवी होती.