महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई विमानतळावर 4 कोटी 93 लाख रुपयांचे सिंथेटिक हिरे जप्त, सीआयएसएफची कारवाई - MUMBAI AIRPORT CISF ACTION

टर्मिनल 2 येथून बँकॉकला जाण्याच्या तयारीत असलेल्या या प्रवाशाच्या बॅगेत संशयास्पद वस्तू दिसल्याने सीआयएसएफचे कर्मचारी सुबोध कुमारांना एक्स-बीआईएस मशीनवर संशयास्पद चित्र दिसले.

Synthetic diamonds worth Rs 4 crore 93 lakh seized
मुंबई विमानतळावर 4 कोटी 93 लाख रुपयांचे सिंथेटिक हिरे जप्त (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 15, 2025, 12:24 PM IST

मुंबई-मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत 4 कोटी 93 लाख रुपयांचे सिंथेटिक हिरे जप्त करण्यात आलेत. हे हिरे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बँकॉकला जाणाऱ्या प्रवाशांच्या हातातील बॅगेमध्ये लपवण्यात आले होते, त्या माध्यमातून त्याची तस्करी करण्यात येत होती. भरत गोविंद नथानी हा प्रवासी त्याच्या हातातील लॅपटॉपच्या बॅगेत लपवून हिरे नेत होता. मध्यरात्री 2.50 वाजताच्या विमानाने हा प्रवासी उड्डाण करणार होता. परंतु तत्पूर्वीच टर्मिनल 2 येथून बँकॉकला जाण्याच्या तयारीत असलेल्या या प्रवाशाच्या बॅगेत संशयास्पद वस्तू दिसल्याने सीआयएसएफचे कर्मचारी सुबोध कुमारांना एक्स-बीआईएस मशीनवर संशयास्पद चित्र दिसले, त्यामुळे सदर प्रवाशाच्या बॅगेची तपासणी करण्यात आलीय.

26 सिंथेटिक हिरे जप्त :सीआयएसएफचे उपनिरीक्षक मीना मुकेश कुमार यांनी त्या बॅगेची तपासणी केल्यावर त्यामध्ये लॅपटॉपच्या बॅटरीच्या डब्यात लपवलेले 26 सिंथेटिक हिरे जप्त करण्यात आलेत. सीआयएसएफने तत्काळ या आरोपी प्रवाशाला आणि हिऱ्यांना पुढील कार्यवाहीसाठी सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटकडे सोपवण्यात आले. एआईयू/सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेले सिंथेटिक हिरे सुमारे 2147.20 कॅरेटचे असून, त्याचे बाजारातील मूल्य 4 कोटी 93 लाख रुपये आहे. सीआयएसएफचे उप महानिरीक्षक अजय दहिया यांच्या स्वाक्षरीने याबाबत प्रसिद्धीपत्रक काढून ही माहिती देण्यात आलीय. हिरे घेऊन जाणारा प्रवासी भरत गोविंद नथानीला अटक करण्यात आलीय.

5 किलो 92 ग्रॅम सोने जप्त :दुसऱ्या घटनेत सीमाशुल्क विभागाने 5 किलो 92 ग्रॅम सोने जप्त केलंय. या सोन्याची तस्करी करणाऱ्या प्रवाशांनी त्यांच्या अंतवस्त्रे आणि बॅगेच्या ट्रॉलीमध्ये हे सोने लपवले होते. तर दुबईहून मुंबईत आलेल्या तीन प्रवाशांकडून 775 ग्रॅम वजनाचे 24 कॅरेट सोने जप्त करण्यात आलेत. त्याशिवाय नैरोबी येथून मुंबईत आलेल्या केनियाच्या 14 प्रवाशांकडून 2741 ग्रॅम वजनाचे 1 कोटी 85 लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आलेत.

ABOUT THE AUTHOR

...view details