निवासी डॉक्टरांच्या मागण्या शासनाकडून मान्य; संप मागे घेतल्यानं रुग्णांना दिलासा - उपमुख्यमंत्री अजित पवार
Strike by Resident Doctors Called off : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी संप पुकारला होता. मात्र राज्य सरकारनं त्यांच्या मागण्या मान्य केल्यामुळं त्यांनी आपला संप मागं घेतलाय.
Published : Feb 7, 2024, 9:09 PM IST
मुंबई Strike by Resident Doctors Called off : राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप मागं घेण्यात आलाय. निवासी डाक्टरांच्या विद्यावेतनात 10 हजार रुपयांची वाढ करण्यात आली असून प्रत्येक महिन्यात ठराविक तारखेला नियमितपणं देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रालयातील त्यांच्या दालनात सेंट्रल मार्ड संघटनेच्या मागण्यांबाबत बैठक पार पडली. यात वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न निवासी डॉक्टरांच्या वसतीगृहांची दुरुस्ती तातडीनं करण्याबाबतही सूचना केल्या आहेत.
निवासी डॉक्टरांच्या सगळ्या मागण्या मान्य :निवासी डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळं प्रस्तावित संप मागं घेण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवाहन केलं होतं. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सेंट्रल मार्ड संघटनेच्या वतीनं प्रस्तावित संप मागं घेतलाय. याबाबतची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलीय.
अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा संप : संपानंतर डॉ अभिजितराजे शेळके यांनी बोलताना सांगितलं की, "कनिष्ठ आणि वरिष्ठ निवासी डॉक्टरांकरिता वसतिगृहात निवासाची व्यवस्था करण्यात यावी, प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत स्टायपेंड मंजूर करण्यात यावं. तसंच सदरचे स्टायपेंडचे पैसे डॉक्टरांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे, केंद्रीय संस्थांप्रमाणे स्टायपेंड रकमेत वाढ करण्यात यावी अशा प्रकारच्या आमच्या मागण्या होत्या. त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थित आमच्या डॉक्टर संघटनेच्या प्रतिनिधीची बैठक झालीय. आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहे." तंसच याची अंमलबजावणी सात दिवसांत झाली नाही तर आम्ही पुन्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन पुढील रणनीती ठरवू, आता आमचा पुकारलेला संप मागं घेत असल्याची घोषणा डॉ अभिजितराजे शेळके यांनी केलीय.
हेही वाचा :
- चर्चा निष्फळ, निवासी डॉक्टरांनी उपसलं संपाचं शस्त्र; काय आहेत डॉक्टरांच्या मागण्या?
- Doctors Strike Thane छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील निवासी डॉक्टर मार्ड संघटनेने पुकारलेल्या संपात सामील
- Resident Doctors Strike : निवासी डॉक्टरांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरू, लेखी आश्वासन दिल्याशिवाय माघार नाही - संपकरी डॉक्टर