महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एसटीच्या भाडेवाढीमुळं प्रवाशांना किती अतिरिक्त पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या सविस्तर - ST FARE HIKE

महाराष्ट्रातील नागरिकांची जीवनवाहिनी अशी ओळख 'लालपरी' अर्थात एसटीची आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून एसटी प्रवासात जवळ-जवळ 15 टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे.

ST FAIR HIKE
लालपरी (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 25, 2025, 6:57 PM IST

Updated : Jan 25, 2025, 8:59 PM IST

मुंबई : गाव-खेड्यातील आणि ग्रामीण भागातील लोकांची जीवनवाहिनी अशी ओळख 'लालपरी' अर्थात एसटीची आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून एसटी प्रवासात 14.95 टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. ही भाडेवाढ (25 जानेवारी) मध्य रात्रीपासून होणार आहे. दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर महागाई कमी होईल, अशी आशा सामान्य लोकांना होती. परंतु, त्याच्या उलट परिस्थिती होताना दिसत आहे. आधीच इंधनाचे भाव गगनाला भिडले असताना आता सामान्यांना परवडणाऱ्या लालपरीचा प्रवासहही महागणार आहे. त्यामुळं आगामी काळात सामान्य लोकांना महागाईची झळ आणखीनचं सोसावी लागणार आहे. एसटीची 14.95% भाडेवाढ झाल्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. हे अतिरिक्त पैसे किती असणार आहेत? ही भाडेवाढ टप्प्यावर असणार की किलोमीटर? तुम्ही प्रवास करत असलेल्या एसटीमध्ये अतिरिक्त किती पैसे मोजावे लागणार आहेत? जाणून घेऊयात त्याबद्दल.

एसटीची सुधारित भाडेवाढ (ETV Bharat GFX)

बस सेवेचा प्रकार आणि सुधारीत भाडे :

  • साधी बस : सध्याचे भाडे प्रति टप्पा 6 कि.मी. 8.70 रुपये, सुधारित भाडे 10.05 रुपये
  • जलद सेवा (साधारण) : सध्याचे भाडे प्रति टप्पा 6 कि.मी. 8.70 रुपये, सुधारित भाडे 10.05 रुपये
  • रात्र सेवा (साधारण बस) : सध्याचे भाडे प्रति टप्पा 6 कि.मी. 8.70 रुपये, सुधारित भाडे 10.05 रुपये
  • निम आराम : सध्याचे भाडे प्रति टप्पा 6 कि.मी. 11.85 रुपये, सुधारित भाडे 13.65 रुपये
  • AC शयन आसनी : सध्याचे भाडे प्रति टप्पा 6 कि.मी. 11.85 रुपये, सुधारित भाडे 13.65 रुपये
  • AC शयनयान : सध्याचे भाडे प्रति टप्पा 6 कि.मी. 11.85 रुपये, सुधारित भाडे 14.75 रुपये
शिवशाहीची सुधारित भाडेवाढ (ETV Bharat GFX)

शिवशाही बसचे सुधारीत भाडे :

  • शिवशाही (AC) : सध्याचे भाडे प्रति टप्पा 6 कि.मी. 12.35 रुपये, सुधारित भाडे 14.20 रुपये
  • जनशिवनेरी (AC) : सध्याचे भाडे प्रति टप्पा 6 कि.मी. 12.95 रुपये, सुधारित भाडे 14.90 रुपये
  • शिवशाही स्लिपर (AC) : सध्याचे भाडे प्रति टप्पा 6 कि.मी. 13.35 रुपये, सुधारित भाडे 15.35 रुपये
  • शिवनेरी (AC) : सध्याचे भाडे प्रति टप्पा 6 कि.मी. 18.50 रुपये, सुधारित भाडे 21.25 रुपये
  • शिवनेरी स्लिपर (AC): सध्याचे भाडे प्रति टप्पा 6 कि.मी. 22 रुपये, सुधारित भाडे 25.35 रुपये
  • ई बस 09 मीटर (AC) : सध्याचे भाडे प्रति टप्पा 6 कि.मी., 12रुपये, सुधारित भाडे 13.80 रुपये
  • ई-शिवाई / ई बस 12 मीटर (AC) : सध्याचे भाडे प्रति टप्पा 6 कि.मी. 13.20 रुपये, सुधारित भाडे 15.15 रुपये

हेही वाचा :

  1. आनंदाची बातमी! लालपरी होणार हायटेक, आता प्रवाशांना एसटीचे LIVE लोकेशन समजणार
  2. एसटी पुन्हा महागणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट संकेत, रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीचंही संकट
  3. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना भरधाव एसटी बसनं उडवलं, तिघांचा जागीच मृत्यू
Last Updated : Jan 25, 2025, 8:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details