महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुचाकी उशिरा परत केल्याच्या वादातून बापलेकानं तरुणाला संपवलं - Son and Father Killed Youth - SON AND FATHER KILLED YOUTH

Son and Father Killed Youth : माणसाला राग कोणत्या गोष्टीचा आणि कधी येईल हे सांगता येत नाही. तसंच या रागाच्या भरात तो काय करेल हेही सांगता येत नाही. अशीच एक धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली. वाचा सविस्तर बातमी.....

Son and father killed youth
अटक केलेले आरोपी आणि मृत तरुण (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 28, 2024, 10:36 AM IST

Updated : Jun 28, 2024, 12:04 PM IST

नागपूर Son and Father Killed Youth : शहरात हत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याचं मागील काही दिवसांच्या घटनांमधून दिसून येत आहे. शहरातील मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बापलेकानं संगनमत करून तरुणाची हत्या केल्याचं उघड झालं. राकेश प्रकाश गमे (२५)असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. राकेश गमे याच्या हत्या प्रकरणामध्ये मानकापूर पोलिसांनी मनोज एकनाथ राजूरकर आणि वडील एकनाथ महादेव राजूरकर या बापलेकाला अटक केली आहे.

माहिती देताना मानकापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (ETV Bharat Reporter)

काय आहे नेमकं प्रकरण? :मृत राकेशनं दारू पिऊन मनोजचे वडील एकनाथ राजूरकर यांना शिवीगाळ केली होती. त्याचा राग मनात धरून बापलेकानं राकेशची हत्या केली असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मानकापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत राकेश गमे व मनोज राजूरकर दोघे चांगले मित्र होते. ते दोघेही दिवसभर फर्निचर तयार करण्याचे काम करायचे आणि संध्याकाळी एकत्र दारू प्यायचे. घटनेच्या वेळी राकेश व मनोज दारू पिण्यास एकत्र आले. मनोजच्या घरीच दारू पार्टी सुरू झाली होती. त्यावेळी दोघांमध्ये काही कारणांवरून वाद झाला. वादात मनोजचे वडील एकनाथ राजूरकर हे देखील पडल्याने राकेशने दारूच्या नशेत त्यांना शिवीगाळ केली. वडिलांना शिवीगाळ केल्याने संतापलेल्या मनोजने वडिलांच्या मदतीने राकेशची हत्या केली.

बापलेकानं केली तरुणाची हत्या : राकेश गमे यानं कामासाठी मनोजची दुचाकी नेली होती. दुचाकी परत आणून देण्यास विलंब का झाला? या कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू होती. बघताबघता दोघांमध्ये हाणामारी देखील सुरू झाल्यानंतर मनोजचे वडील एकनाथ यांनी या दोघांना दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राकेशने एकनाथ राजूरकर यांना शिवीगाळ केली. त्यामुळे मनोजसोबतच एकनाथ राजूरकर हे देखील संतापले होते. रागाच्या भरात दोघांनी राकेशच्या डोक्यावर लाकडी पाटा मारून त्याला जखमी केलं.

उपचारादरम्यान मृत्यू : आरोपी मनोज व एकनाथ राजुरकर यांच्या घरात सुरू असलेल्या भांडणाची माहिती पोलिसांना समजली. पोलिसांनी तत्काळ दखल घेत घटनास्थळ गाठले, तेव्हा राकेश रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला तत्काळ उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्यानंतर मानकापूर पोलिसांनी लगेच आरोपी मनोज आणि त्याचे वडील एकनाथ राजूरकर यांना अटक केली.

हेही वाचा -

  1. फोटोग्राफर विनय पुणेकरची गोळ्या झाडून हत्या; चार महिन्यानंतर आरोपीला लुधियानातून अटक - Vinay Punekar Murder Case
  2. नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर - Nagpur Airport Threat
Last Updated : Jun 28, 2024, 12:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details