सांगली Sambhaji Bhide :संभाजी भिडे यांच्याकडून पुन्हा वादग्रस्त विधान करण्यात आलं आहे. देशावर असंख्य अतिक्रमणं झालेला XXX लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्तान आहे, तसंच गणपती उत्सवाचा आज चोथा झाला असून नवरात्र उत्सवाचा दांडिया हिंदू समाजाला XXX बनवत चालला आहे, असं वादग्रस्त विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे, ते सांगलीच्या दुर्गामाता दौड प्रसंगी बोलत होते.
नवरात्रीच्या निमित्ताने भिडेंची पुन्हा मुक्ताफळे -वादग्रस्त विधानासाठी ओळख असणारे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. दरवर्षी प्रमाणे नवरात्राच्या निमित्तानं दुर्गामाता दौडीचं आयोजन करण्यात येतं. त्याप्रमाणे सांगलीमध्ये आजपासून शुभ प्रतिष्ठानची दुर्गामाता दौड सुरू झाली आहे आणि दुर्गामाता दौडच्या निमित्ताने बोलताना संभाजी भिडे गुरुजींनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे.
दुर्गामाता दौड आणि संभाजी भिडे (ईटीव्ही भारत बातमीदार) दांडिया हिंदू समाजाला.... - यावेळी संभाजी भिडे म्हणाले, हिंदी-चिनी आणि हिंदू-मुस्लिम भाई म्हणणाऱ्या हिंदूना शत्रू कोण, वैरी कोण, वाईट कोण, चांगलं कोण, हे कळत नाही. कारण हिंदू महामूर्ख आहे. तसंच गणपती उत्सवाचा चोथा झाला आहे. नवरात्र उत्सवाचा दांडिया हिंदू समाजाला XXX बनवत चालला आहे. नवरात्राचा बट्ट्याबोळ आम्ही होऊ देणार नाही, असंही संभाजी भिडे यांनी स्पष्ट केलं.
संभाजी भिडे यांचं पोलिसांना आवाहन - पुढे संभाजी भिडे म्हणाले, राजकारण, सत्ताकारण, अर्थकारण शूद्र आहे, हे थुंकण्याच्या लायकीचेही विषय नाहीत. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या रक्ताचा समाज निर्माण करण्याची गरज आहे, असंही संभाजी भिडे म्हणाले आहेत. तसंच दुर्गामाता दौडीमध्ये असणाऱ्या पोलिसांनी देखील टोप्या घालून आपल्या सोबत दौडीत धावलं पाहिजे, असं ही यावेळी संभाजी भिडे यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा...
- आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री: संभाजी भिडे यांचं स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य - Bhide Controversial Statement
- संभाजी भिडे यांचं वय बघून त्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, दीपक केसरकरांचं मत - Deepak Kesarkar On Sambhaji Bhide