'हु किल्ड करकरे' पुस्तकाचे लेखक शमशुद्दीन मुश्रीफ (reporter) कोल्हापूर SM Mushrif on Ujjwal Nikam : "हेमंत करकरे (Hemant Karkare) यांना लागलेली गोळी कसाबच्या बंदुकीतील नसून 'आरएसएस' समर्थक पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीतील होती. मात्र, न्यायालयात याबाबत पुरावे लपण्यात आले होते. ते पुरावे लपवणारे देशद्रोही कोण असेल, तर ते उज्ज्वल निकम आहेत," असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. यावरच आता 'हु किल्ड करकरे' पुस्तकाचे लेखक माजी पोलीस अधिकारी शमशुद्दीन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिलीय.
काय म्हणाले शमशुद्दीन मुश्रीफ? : यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना 'हु किल्ड करकरे' पुस्तकाचे लेखक माजी पोलीस अधिकारी शमशुद्दीन मुश्रीफ म्हणाले की, "मुंबईवर 26/11 दहशतवादी हल्ला होणार अशी माहिती अमेरिकेच्या गुप्तचर संघटनांनी आयबी खात्याला दिली होती. मुंबईतील दोन हॉटेलवर हल्ला करण्यासाठी बोट निघाली असून त्याचे अक्षांश आणि रेखांश असे आहेत, अशी इत्यंभूत माहिती अमेरिकन एजन्सीकडून मिळाली असतानाही ही माहिती मुंबई पोलीस, महाराष्ट्र शासन यांना देण्याची जबाबदारी गुप्तचर संघटनेचे अधिकारी तत्कालीन अधिकारी प्रभाकर अलोक यांची होती. परंतु, खटला सुरू झाल्यानंतर आरएसएस आणि उज्ज्वल निकम या दोघांनी मिळून त्यावेळी शासन आणि कोर्टाची दिशाभूल केली. त्यामुळं या सगळ्या बाबींसाठी उज्ज्वल निकम संपूर्णपणे जबाबदार आहेत, आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे", अशी मागणी मुश्रीफ यांनी केली. तसंच विजय वडेट्टीवार यांनी उज्ज्वल निकम यांच्यावर केलेले सर्व आरोप खरे असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
काय आहे नेमकं प्रकरण? :पुढं ते म्हणाले की, "26/11 च्या हल्ल्याची भारताच्या कॅबिनेट सेक्रेटरींमार्फत चौकशी झाली होती, या चौकशीत तत्कालीन गुप्तहेर संघटनेचे अधिकारी प्रभाकर अलोक यांनी माहिती न दिल्यानं हा हल्ला झाल्याचं निष्पन्न झालं. या संपूर्ण चौकशीच्या बातम्या 11 डिसेंबर 2008 च्या अंकात प्रसिद्ध झाल्या होत्या. या हल्ल्यात 168 नागरिकांनी आपले प्राण गमावले तर शेकडो लोक जखमी झाले होते. या सर्व गोष्टींना प्रभाकर अलोक जबाबदार असल्याचं सिद्ध झालं होतं, आणि ही माहिती या खटल्याचे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टाच्या निदर्शनाला आणणं जरूरीचं होतं. मात्र, त्यांनी ही माहिती जाणून-बुजून कोर्टाच्या निदर्शनास आणली नाही. आरएसएसच्या लोकांना वाचवण्यासाठी उज्ज्वल निकम यांनी हल्ला होऊ देणाऱ्यांना आणि ज्यांनी करकरेंना मारलं त्यांना वाचवलं." तसंच करकरेंना कोणी आणि का मारलं याची माहिती 'हु किल्ड करकरे?' या पुस्तकात मी पुराव्यांसह दिली असल्याचंही मुश्रीफांनी सांगितलं.
भाजपानं केली तक्रार दाखल : २६/११ च्या मुंबई हल्ल्याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपानं तक्रार दाखल केली आहे. निवडणूक आयोगानं चौकशी करून आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईची मागणी भाजपानं केली.
हेही वाचा -
- २६/११ संदर्भात विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य निराधार, उज्ज्वल निकम यांचा दावा, 'गोबेल्स प्रचार' असल्याचा केला आरोप - Ujjwal Nikam On Vijay Wadettiwar
- रवींद्र धंगेकर एक लाख मतांनी निवडून येणार; विजय वडेट्टीवार यांचा विश्वास - Lok Sabha Election 2024
- हेमंत करकरेंना 'आरएसएस' समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातल्या गोळ्या, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ - Vijay Wadettiwar