महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बहिणीची छेड काढताना बघितलं, आरोपी नातेवाईकानं चिमुकल्या भावाला संपवलं - Thane Murder Case - THANE MURDER CASE

Thane Murder Case : ठाण्यात ६ वर्षीय अल्पवीयन मुलाची हत्या (Murder News) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी (Narpoli Police) आरोपीस ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत.

Thane Murder Case
ठाण्यात मुलाची हत्या (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 26, 2024, 10:36 PM IST

ठाणे Thane Murder Case : भिवंडी तालुक्यातील हायवे दिवे गावातील एका इमारतीत एका ६ वर्षीय मुलाची नातेवाईकानेच गळा आवळून हत्या केल्याची घटना समोर आली. धक्कादायक बाब म्हणजे मृतकाच्या बहिणीची आरोपी नातेवाईक इमारतीच्या छतावर छेड काढताना मृत अल्पवयीन भावाने पाहिलं होतं. घडलेला प्रकाराची तक्रार आईकडे करणार असं अल्पवयीन मुलाने सांगितलं. त्यामुळं नराधम नातेवाईकानं त्याची गळा आवळून हत्या केली. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी तांत्रिक तपास करून २४ तासातच आरोपी नातेवाईकाला बेड्या ठोकल्या आहेत.

प्रतिक्रिया देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत कामत (ETV BHARAT Reporter)


काय आहे घटना? :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक मुलगा आई-वडील, बहिणी आणि आरोपी नातेवाईक यांच्यासोबत भिवंडी तालुक्यातील हायवे दिवे गावातील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहत होता. खबळजनक बाब म्हणजे आरोपीला मृतकाच्या आईवडिलांनी नातेवाईक म्हणून आपल्याच घरात आसरा दिली होता. मात्र, त्यांचा विश्वासघात करून त्यांच्याच १८ वर्षीय मुलीवर वाईटनजर ठेवून आरोपी होता. त्यातच २१ जुलै रोजी इमारतीच्या छतावर अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेची माहिती नारपोली पोलिसांना मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून नारपोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र, त्यानंतर अल्पवयीन मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रवाना करण्यात आला होता. त्यावेळी अल्पवयीन मुलाच्या गळ्यावर व्रण असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.


आरोपीला ठोकल्या बेड्या : नारपोली पोलिसांनी भादंविच्या कलम १०३(१) अन्वये अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. परंतु, तोपर्यंत आरोपी नराधम हा फोन बंद करून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे गेल्याने त्याच्यावर संशय बळावला होता. दुसरीकडं पोलीस पथकाला आरोपीच्या मोबाईल लोकेशनच्याआधारे त्याचा शोध सुरू केला. त्यावेळी आरोपी मूळगावी गेल्याचं समजलं. त्यानंतर तिथून मित्रांच्या मदतीनं छत्रपती संभाजीनगर कन्नड येथे असल्याचं पोलिसांना समजलं. दरम्यान, पोलीस निरिक्षक भरत कामत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद कुभांर, विजय मोरे, हुडेकरी, जाधव, देसले, ताटे आदि पोलिस पथकाने आरोपीस कन्नडहून ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत.

मुलाची हत्या केल्याची दिली कबुली :या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत कामत यांनी सांगितलं की, आरोपी हा मृतक मुलाचा नातेवाईक असून तो त्याच्यांच घरात राहत होता. घटनेच्या दिवशी इमारतीच्या छतावर मृतकच्या बहिणीला आरोपी छेड काढत असल्याचं पाहिल्यानं आता आपलं बिंग फुटणार या हेतून मुलाची छतावरच गळा आवळून हत्या केली. आई-वडिलांना सांगितलं की, याला अचानक चक्कर येऊन पडल्यानं तो बेशुद्ध झाला असा बनाव करून तो फरार झाला होता. मात्र शिताफीनं तपासत करून त्याला कन्नड तालुक्यातील हिवरखेडा गावातून सापळा रचून ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याच्याकडं चौकशी केली असता त्यानेच मुलाची हत्या केल्याची कबुली दिली. तर २६ जुलै रोजी आरोपीस न्यायालयात हजर केले असता १ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास विजय मोरे करीत आहेत.



हेही वाचा -

  1. वरळी स्पामधील हत्या प्रकरण: मृत वाघमारेनं मांड्यांवर 22 शत्रूंची नावं टॅटूत कोरली, पोलिसही चक्रावले - Guru Siddappa Ambadas Waghmare
  2. राजुऱ्यात फिल्मी स्टाईलनं हत्या; एक वर्षांपूर्वी झाला गोळीबार, आरोपीनं त्याच दिवशी त्याच वेळी घेतला बदला - Rajura Gun Shot Death Case
  3. मंदिराच्या पुजाऱ्यांनी महिलेवर सामूहिक बलात्कार करून केली हत्या; तिघांना अटक - gang rape

ABOUT THE AUTHOR

...view details