चेन्नई SriLankan Tamil Refugees : वादग्रस्त विधेयक मंजूर झाल्यानंतर चार वर्षांनंतर मोदी सरकारने गेल्या महिन्यात नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याच्या नियमांची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली. CAA अंतर्गत, 31 डिसेंबर 2014 रोजी किंवा त्यापूर्वी भारतात प्रवेश केलेल्या अफगाणिस्तान, बांगलादेश किंवा पाकिस्तानमधील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन स्थलांतरितांना जलदगतीने भारतीय नागरिकत्व प्रदान केले जाईल.
धार्मिक अल्पसंख्याकांच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर : राजकीय आणि सामाजिक वर्तुळांनी त्याच्या उणीवा अधोरेखित केल्या आणि त्याला 'भेदभावपूर्ण' म्हणून संबोधलं, कडक टीका होत असताना कायद्याला हिरवा सिग्नल मिळाला. कायद्याच्या विरोधात उपस्थित असलेल्या प्रश्नांपैकी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ते सर्व धार्मिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करत नाही किंवा ते सर्व शेजाऱ्यांना लागू होत नाही. भारतात अनेक स्थलांतरित समुदाय आहेत जे CAA अंतर्गत समाविष्ट असलेल्या स्थितीत आहेत. सुमारे 60,000 लोकसंख्येचा असाच एक समुदाय म्हणजे श्रीलंकन तमिळ निर्वासित. काही प्रकाशनांद्वारे 'नोव्हेअर पीपल' असे संबोधले जाणारे हे निर्वासित 1980 च्या दशकात श्रीलंकेच्या गृहयुद्धातून सुरक्षिततेच्या शोधात भारतात आले.
बिकट वर्तमान आणि अंधकारमय भविष्य :मदुराई आणि कोईम्बतूर येथील त्यांच्या शिबिरांना भेट दिल्याने हे निर्वासित कोणत्या भयंकर स्थितीत राहात आहेत हे दिसून येतं. कोईम्बतूर येथील पूलुवापट्टी शिबिरात, सुमारे 1800 तमिळ निर्वासितांना तात्पुरत्या सिंगल किंवा दोन खोल्यांच्या एस्बेस्टोस-छताच्या घरांमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यापैकी बहुतेकांकडे घरात शौचालये नाहीत आणि त्यांना सार्वजनिक शौचालये वापरावी लागतात, दर शंभर निर्वासितांमागे सुमारे एक शौचालय आहे. विशेषतः महिला आणि लहान मुलांना अस्वच्छ वातावरणात राहावे लागते. गैर-नागरिकत्वामुळे संधींचा अभाव त्यांच्या राहणीमानात सुधारणा करण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना अडथळा आणतो. शिबिरांमधील तरुण मृगजळाचा पाठलाग करताना दिसतात; कारण ते वाजवी रोजगाराच्या आशेशिवाय शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतात.