मुंबई-पुढील आठवड्यापासून मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात शॉर्ट स्कर्ट किंवा शॉर्ट ड्रेस परिधान केलेल्या भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. तसे परिपत्रकच सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाने जारी केलंय. मंदिर परिसरात आध्यात्मिक वातावरण कायम राहावे, यासाठी ही घोषणा करण्यात आल्याचे मंदिराच्या विश्वस्त कमिटीचे म्हणणे आहे. यासाठी श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने औपचारिक ड्रेस कोड जारी केलाय. मंदिरात जाण्यासाठी भाविकांना पारंपरिक किंवा पूर्ण अंग झाकणारे कपडे घालावे लागतील, असे ट्रस्टचे म्हणणे आहे.
...तर भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही :याबाबत श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने म्हटले आहे की, पुढील आठवड्यापासून लहान किंवा तोकडे कपडे परिधान केलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. या संदर्भात अनेक तक्रारी आल्यानंतर 'ड्रेस कोड'चा हा निर्णय घेण्यात आल्याचे ट्रस्टचे म्हणणं आहे. या संदर्भात अनेक भाविकांनी ट्रस्टला पत्र लिहून अयोग्य कपडे परिधान करून येणाऱ्या लोकांवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे ट्रस्टचे म्हणणे आहे.
अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात : मुंबईतील हे प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर प्रभादेवी परिसरात बांधण्यात आलेले आहे. इथे दर मंगळवारी अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. इतकेच नव्हे तर अनेक सेलिब्रिटी, बडे नेतेदेखील दर्शनासाठी जात असतात. मुंबईतील नेते आपला उमेदवारी अर्ज भरण्याआधी इथेच दर्शनासाठी जातात. ट्रस्टने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, “स्कर्ट किंवा स्टीच जीन्स, शॉर्ट स्कर्ट किंवा ज्या कपड्यांमधून शरीराचे अवयव दिसणारे कपडे परिधान केलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, "अशा भक्तांना मंदिराच्या बाहेरूनच दूर केले जाईल," असे मंदिर संस्थानाने म्हटले आहे.
सिद्धिविनायक मंदिरात आता ड्रेस कोड, फॅशनेबल कपडे घातल्यास प्रवेश मिळणार नाही - SIDDHIVINAYAK TEMPLE
श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने औपचारिक ड्रेस कोड जारी केलाय. मंदिरात जाण्यासाठी भाविकांना पारंपरिक किंवा पूर्ण अंग झाकणारे कपडे घालावे लागतील, असे ट्रस्टचे म्हणणे आहे.
सिद्धिविनायक मंदिर (Source- ETV Bharat)
Published : Jan 29, 2025, 3:08 PM IST
पावित्र्य राखण्यासाठी 'ड्रेस कोड' लागू : सर्व भाविकांना दर्शनादरम्यान कोणताही संकोच वाटू नये तसेच मंदिर परिसराची मर्यादा आणि पावित्र्य राखण्यासाठी 'ड्रेस कोड' लागू करण्यात येत असल्याचे ट्रस्टने स्पष्ट केले. मंदिराला देशभरातून दररोज हजारो भाविक भेट देतात आणि त्यापैकी अनेक भक्तांनी पोशाखाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे ट्रस्टचे म्हणणे आहे.
हेही वाचा-