महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक लोकसभा मतदार संघातून चार बाबा निवडणूक लढण्यास इच्छुक - Trimbakeshwar Akhara Parishad

Nashik Lok Sabha Election : नाशिक लोकसभा मतदार संघात उमेदवारी लढवण्यासाठी आणखी एका बाबांनी उडी घेतली आहे. आदिवासी भागाचा विकास करण्यासाठी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा मानस श्रीराम शक्तीपीठाचे सिद्धेश्वरानंद महाराज यांनी केला असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अधिक रंजक होणार आहे.

Nashik Lok Sabha Election
सिद्धेश्वरानंद महाराज

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 21, 2024, 10:56 PM IST

सिद्धेश्वरानंद महाराज लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीविषयी बोलताना

नाशिकNashik Lok Sabha Election: धार्मिक, आध्यात्मिक नगरी म्हणून नाशिकची ओळख आहे. याच नाशिकमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी धर्मगुरू निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. यात महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज, स्वामी कंठानंद, अनिकेत शास्त्री देशपांडे आणि आता सिद्धेश्वरानंद महाराज यांनी इच्छा व्यक्त केली असून निवडणुकीसाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. या चारही धर्मगुरूंनी निवडणूक लढवण्याची इच्छा जरी व्यक्त केली असली तरी कुठल्या पक्षातून किंवा अपक्ष उमेदवारी लढवणार याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे.


काय म्हटले सिद्धेश्वरानंद महाराज? :नाशिक लोकसभा मतदारसंघातील बहुतांश भाग हा आदिवासी भाग आहे. या ठिकाणी कुपोषणाचा मोठा प्रश्न आहे. या आधी अनेक लोकप्रतिनिधी निवडून आले असले तरी या भागाचा पाहिजे तसा विकास झाला नाही. तसेच साधूंना समाजात सन्मान मिळत नाही. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. मागील काही वर्षांपूर्वी पालघर येथे साधूंची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याचवर कोणी लोकप्रतिनिधीनी आवाज उठवला नाही. तसेच साधूंना एका विशिष्ट वयानंतर पेन्शन मिळाली पाहिजे असे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आम्हाला त्र्यंबकेश्वर आखाडा परिषदेसह इतर दहा आखाड्यांनीही पाठिंबा दिला असल्याचा दावा सिद्धेश्वरानंद महाराज यांनी केला आहे.


राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी निवडणूक लढवणार :दुसरीकडे जय बाबाजी भक्त परिवाराच्यावतीनं महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांना नाशिक लोकसभा निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभक्ती आणि राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी महाराज निवडणूक लढवणार असल्याचं भक्त परिवाराचे प्रवक्ते विष्णू महाराज यांनी सांगितले. नाशिक मतदारसंघात जय बाबाजी भक्त परिवाराची संख्या दोन लाखाहून अधिक आहे. तर स्वामी कंठानंद यांच्यासाठी नाशिकच्या काही उद्योजक, वैद्यकीय क्षेत्र, शेती आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र लिहून स्वामींच्या उमेदवारीसाठी साकडे घातले आहे.

संधीचं सोनं करू :स्वामी कंठानंद हे रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्या शिष्य परंपरेतील आहेत. त्यांनी नाशिकमध्ये 2005 मध्ये श्रीकृष्ण आरोग्य संस्था सुरू केली आणि त्या माध्यमातून सेवा कार्य करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीप्रमाणे नाशिक तीर्थक्षेत्रामधून लोकसभा निवडणूक लढवली तर हा महाराष्ट्रासाठी सुवर्णकाळ ठरेल. यामुळं रखडलेली कामं मार्गी लागतील आणि नाशिकचा मंत्रभूमी ते यंत्रभूमी हा प्रवास खऱ्या अर्थानं पूर्ण होईल, अशी इच्छा महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी व्यक्त केली होती. मात्र, पंतप्रधान मोदींनी हा प्रस्ताव मान्य न केल्यास नाशिकच्या धार्मिक, आध्यात्मिक विकास व पर्यटन वाढवण्यासाठी आपण इच्छुक असून भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी संधी दिल्यास आपण नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास करू, असं मत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा:

  1. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना ईडीकडून अटक; 'आप'ची सर्वोच्च न्यायालयात धाव - ED Arrest Arvind Kejriwal
  2. साताऱ्याहून मुंबईला जाताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या वाहनाला अपघात, आठवले सुखरूप - Ramdas Athawale Car Accident
  3. महाराष्ट्रातील काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर; शाहू महाराज, रवींद्र धंगेकर, प्रणिती शिंदे रिंगणात - Congress Candidate List

ABOUT THE AUTHOR

...view details