मुंबई Salim Khan Threat : प्रसिद्ध पटकथा लेखक आणि प्रसिद्ध अभिनेता सलमान खानचे (Salman Khan) वडील सलीम खान यांना मिळालेल्या धमकीच्या अनुषंगाने वांद्रे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती आणि बुरखाधारी महिलेविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 353(2), 292, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अनोळखी आरोपीचा शोध चालू असल्याची माहिती, वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मराठे यांनी दिली आहे.
वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : सलीम खान यांना मिळालेल्या धमकीच्या अनुषंगाने, पोलीस हवालदार दीपक बोरसे, यांनी तक्रार दाखल केली आहे. तर अनोळखी स्कूटी चालक आणि बुरखाधारी महिलेविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? :सिने अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान आपल्या कुटुंबासह वांद्रे पश्चिम येथे गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतात. 18 सप्टेंबर रोजी सकाळी 8.45 वाजता बँडस्टॅन्ड येथे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. ते थकल्याने विंडमेरे बिल्डिंगच्या समोर प्रोमोनाडमधील कट्ट्यावर बसले होते. गॅलेक्सीकडून बँड स्टॅन्डच्या दिशेने जाणारी एक अनोळखी स्कूटी आली. त्या स्कूटीवर पाठीमागे एक बुरखाधारी महिला बसली होती. ती स्कूटी यू टूर्न करून आली आणि त्यांनी सलीम खानच्या जवळ स्कूटी थांबवून, 'लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या' अशी धमकी देऊन निघून गेले.
आरोपीचा शोध सुरू :फिर्यादी असलेल्या पोलीस हवालदार यांनी त्या स्कूटीचा नंबर पहिला असता स्कूटीचा नं.7444 असल्याचं दिसलं. संपूर्ण नंबर त्यांना दिसला नाही. फिर्यादी यांचा सविस्तर जबाब नोंद करून त्या स्कूटी चालक आणि बुरखाधारी महिले विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अनोळखी आरोपीचा शोध चालू असल्याची माहिती, वांद्रे पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा -
- सलमानच्या जीवावर उठलेल्यांना सलीम खाननी म्हटलं 'जाहिल लोग', मुंबई पोलिसांचं केलं कौतुक!! - Salman Khan
- The Invincibles Story of Salim Khan : सलमान खानचे वडील सलीम खान यांनी का केले दुसरे लग्न; त्यांनीच सांगितली याची रहस्यमय स्टोरी
- Salman Khan denied threat calls : कोणत्याही व्यक्तीकडून धमकी किंवा धमकीचा कॉल नाही- अभिनेता सलमान खानचा पोलिसांना जबाब