छत्रपती संभाजीनगर : एकनाथ शिंदे यांनाउठाव केला असं अलिकडे सांगण्यात येत आहं खरं तर उठाव करायला एकनाथ शिंदे हे काही मंगल पांडे नाहीत असं विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते अबादास दानवे यांनी केलीय. ते गद्दारच आहेत, असंही दानवे म्हणाले. सत्तेच्या मोहापायी आणि ईडी कारवाईच्या भीतीनं त्यांनी गद्दारीच केली अशी टीका विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली. ज्यावेळी सत्ता भोगत होते, त्यावेळी घरगडी किंवा सवंगडी आठवला नाही. आज ते आपल्या पक्षातील लोकांना कसं वागवत आहेत बघा, त्यांचा मुलगा कसं वागवतो ते बघा. घरगडीपेक्षा वाईट परिस्थिती आहे. एकनाथ शिंदे काही बोलत नाहीत, त्यांचा मुलगाच सगळं बोलतो, अशी टीका देखील अंबादास दानवे यांनी केली.
धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा : "धनंजय मुंडे दोषी नाहीत, त्यामुळं त्यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही." असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यावर विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी टीका करत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. "नैतिक जबाबदारी लक्षात घेता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमचे त्यावेळचे मंत्री संजय राठोड यांनी देखील राजीनामा दिला होता. बीड प्रकरणात वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे हे सावलीसारखे सोबत आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे दोषी आहेत असं वाटतं, म्हणूनच त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे."
माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे (ETV Bharat Reporter) ज्यांना जायचं त्यांनी जावं : "ठाकरे गटाचे खासदार जेवण करायला गेले म्हणून टीका होत आहे. एखाद्याचे व्यक्तिगत संबंध असतील तर, बोलवले तर जाणं वेगळं नाही. ते प्रतापराव जाधव यांना फोडायला गेले असतील तर? आम्ही जर, व्यक्तिगत भेटलो तर गळे पकडायचे का?" अशा शब्दात अंबादास दानवे यांनी उत्तर दिलं. "कोकणात आमची संघटना आहे, तिथं आमदार असणं आणि संघटन यात फरक, तुकडा टाकला तर जाणारे गद्दार आहेत. ज्याला जायचं त्यांनी जावं, कुणाची मिन्नतवारी करायची नाही." अशी भूमिका अंबादास दानवे यांनी जाहीर केली.
वाघनखं आणावीत : "देशात छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आणली असं म्हणतात. जिथं भोसले यांचं वास्तव्य होतं, किंवा त्यांचा स्पर्श झाला, त्या ठिकाणी ती वाघ नखं नेणार असं सरकारनं सांगितलं. मात्र, जिथं भोसले यांचा जन्म झाला तिथं वाघ नखांचं प्रदर्शन का ठेवलं नाही?" असा प्रश्न दानवे यांनी उपस्थितीत केला. मराठवाड्यात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज इथं आले याचे पुरावे आहेत, त्यांचा स्पर्श आहे. इथ प्रदर्शन न ठेवून दुर्लक्ष केलं आहे. त्यांनी इथ वाघनखांचं प्रदर्शन ठेवायला पाहिजे होतं, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.
हेही वाचा :
- शिर्डी साईबाबा मंदिराच्या कळसाला पुन्हा सुवर्ण मुलामा
- मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून आता मदत मिळवणं होणार सोपं, जाणून घ्या कसं ?
- जामनेर शहरात रंगणार आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचा थरार; 'या' 9 देशांचे दिग्गज मल्ल होणार सहभागी