महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साईबाबा संस्थानवर नव्याने विश्वस्त मंडळ येणार; राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेल्या साई संस्थानच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी? - SHIRDI NEW TRUST BOARD

राज्यात आता भाजपा महायुतीचे सरकार आल्याने साई संस्थानच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे डोळे लागून राहिले आहेत.

Shirdi Sai Baba Sansthan
शिर्डी साईबाबा संस्थान (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 27, 2024, 1:35 PM IST

शिर्डीःराज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेलं असतानाच देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डी साईबाबा संस्थानवर विश्वस्त मंडळ येणार का ? याचीही उत्सुकता सगळ्यांना लागलीय. राज्यात आता भाजपा महायुतीचे सरकार आल्याने साई संस्थानच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे डोळे लागून राहिले आहेत.

साई संस्थानाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण : श्रद्धा अन् सबुरीचा मंत्र देणाऱ्या शिर्डीतील साईबाबांंच्या साई संस्थानाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झालीत. दरम्यान 2012 ते 2024 या 12 वर्षांच्या कालावधीत 2018 शताब्दी वर्षात भाजपा-सेना युतीच्या सरकारमध्ये तत्कालीन अध्यक्ष सुरेश हावरे यांना विश्वस्त मंडळाचा जेमतेम 3 वर्ष कारभार चालवता आलाय. तसेच 2021 मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वात विश्वस्त मंडळाला दीड वर्ष काम करता आलेलं आहे. त्यामुळे त्यांना पुरेसा वेळ मिळालेला नाही.

साईबाबा संस्थानचा कारभार त्रिसदस्य समिती संस्थानकडे :सुरेश हावरे यांच्या कार्यकाळात मोठ-मोठ्या घोषणा झाल्या, परंतु त्या सत्यात उतरल्याचे आतापर्यंत दिसून आलेलं नाही. दोन्ही विश्वस्त मंडळाचा हा चार-साडेचार वर्षांचा कालावधी वगळला तर आतापर्यंत साईबाबा संस्थानचा कारभार त्रिसदस्य समिती संस्थान पाहत आहे. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना महायुतीला जनतेने भरभरून मते देऊन सत्तेत महायुतीचे सरकार आणलंय. मागील अडीच वर्षांच्या कालखंडात महायुती सरकार असताना साई संस्थानवर विश्वस्त मंडळाची नियुक्ती होणे अपेक्षित होते. मात्र तसे काही झाले नाही. त्याबरोबरच एसटी महामंडळ वगळता इतर महामंडळावर ही नव्याने निवड झालेली नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी येथील साईबाबा संस्थानवर कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

विश्वस्त मंडळात एकूण 15 सदस्य : वर्ष 1922 साली साई संस्थान स्थापनेवेळी विश्वस्त मंडळात एकूण 15 सदस्य होते. तर भक्त मंडळात 232 सदस्यांचा समावेश होता. त्यावेळी संस्थानकडे स्थापनेवेळी केवळ 2 हजार 238 रुपये होते. आज मात्र 100 वर्षांत 2 हजार 200 कोटींहून अधिक ठेवी आहेत, तसेच 450 किलो सोने, साडेपाच हजार किलो चांदी, तर 10 कोटींचे मौल्यवान हिरे एवढी संपत्ती आहे. आता राज्यात स्थिर सरकार आल्याने साई संस्थानवर प्रलंबित असलेल्या विश्वस्त मंडळाचा तिढा सुटेल, असा विश्वास शिर्डी ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आलाय.

हेही वाचा :

  1. "देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार; एकनाथ शिंदेंची नाराजी दूर करण्याची गरज"
  2. शिवसेनेचे खासदार घेणार मोदींची भेट, भेटीमागचे कारण काय?

ABOUT THE AUTHOR

...view details