शिर्डी Shirdi Crime News : शिर्डीमध्ये धक्कादायक घटना घडली असून शिर्डी साईसंस्थानच्या (Shirdi Sai Sansthan) साईआश्रम (Sai Ashram) भक्तनिवासात आज (17 मार्च) मृतदेह आढळल्यानं सर्वत्र एकच उडाली. मिळालेल्या माहितीनुसार मृतकाची ओळख पटली आहे. तसंच ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
चार दिवसांपुर्वी घेतली होती खोली : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुताला शंकराराव (वय- 45, वडलापुडी, आंध्रप्रदेश) असं मृताचं नाव आहे. रुताला यांनी 14 मार्च रोजी साईआश्रम भक्तनिवासात भाडोत्री रूम घेतली होती. ही रूम त्यांनी ऑनलाईन पद्धतीनं दोन दिवसांसाठी बुक केली होती. रूम बुक करतांना त्यांनी आपलं आणि आपल्या वडिलांचं नाव टाकलं होतं. मात्र, रुताला शंकराराव हे एकटेच शिर्डीत आले होते. परंतू रूमच्या आत गेल्यापासून ते रूमच्या बाहेर पडलेच नाही. चार दिवस होऊनही त्यांचा आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता. तसंच रूममधून उग्र वासही येऊ लागल्यानं साईसंस्थाननं शिर्डी पोलिसांना यासंदर्भातील माहिती दिली.