महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शरद पवार यांनी घेतली संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची भेट: मुलीच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी - SANTOSH DESHMUKH MURDER CASE

बीड जिल्ह्यातील मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांची मारेकऱ्यांनी हत्या केली. या प्रकरणी आज शरद पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

Santosh Deshmukh Murder Case
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : 7 hours ago

Updated : 1 hours ago

पुणे :विधानसभा हिवाळी अधिवेशन 2024 मध्ये सोमनाथ सुर्यवंशी कोठडीतील मृत्यू आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजलं आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि संवाद साधला.

राज्यात काय चाललंय, शरद पवारांचा सवाल :राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोग इथं आज भेट दिली. शरद पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, की "संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानं सर्वाना धक्का बसला. या जिल्ह्यात वारकरी संप्रदाय आहे. त्यामुळं ही घुटना कुणालाही न पटणारी घटना आहे. जी घटना घडली यात सरपंच संतोष देशमुख यांचा काहीही संबंध नव्हता. या घटनेची नोंद राज्य आणि केंद्र सरकारनं घ्यावी. खासदार बजरंग सोनवणे यांनी हा प्रश्न लोकसभेत मांडला. या राज्यात काय चाललंय, असा सवाल यावेळी शरद पवार यांनी केला. संतोष देशमुख खून प्रकरणाच्या खोलात गेलं पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला मदत केली. मात्र या घटनेच्या खोलात जाऊन मुख्य सूत्रधार शोधून काढला पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकारमधील लोकप्रतिनिधी हे सर्व या कुटुंबाच्या मागे आहेत. बीड जिल्ह्यात संतोष देशमुख खून प्रकरणानं दहशत पसरली आहे. त्यामुळं या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे," असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

प्रतिक्रिया देताना शरद पवार (ETV Bharat Reporter)

मुलीच्या शिक्षणाची शरद पवारांनी घेतली जबाबदारी :बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानं राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. विधानसभा हिवाळी अधिवेशनातही संतोष देशमुख हत्या प्रकरणानं मोठा गदारोळ झाला आहे. विरोधकांनी सत्ताधारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. आज शरद पवार यांनी मस्साजोग इथं जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेत असल्याचं जाहीर केलं.

हेही वाचा :

  1. संतोष देशमुख हत्या प्रकरण: खाते वाटपापूर्वीच धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ? सुरेश धस नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर
  2. संतोष देशमुख हत्याप्रकरणात एन्काउंटर करून मिळवा 51 लाखांसह 5 एकर जमीन, शेतकऱ्यानं का दिली ऑफर?
  3. संतोष देशमुख हत्या प्रकरण; पीएसआय राजेश पाटील आणि आरोपी भेटल्याचा व्हिडीओ आला समोर
Last Updated : 1 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details