महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आढळराव पाटील राष्ट्रवादीत दाखल होताच शरद पवार गट आक्रमक, पक्ष सक्षम नसल्याची जगतापांची टीका - Shivaji Adhalrao Patil Join NCP - SHIVAJI ADHALRAO PATIL JOIN NCP

Shivaji Adhalrao Patil Join NCP : शिरुरचे माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांंनी आज मंगळवार (दि. 26 मार्च)रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता शरद पवार गटाकडून आढळराव पाटलांसह अजित पवारांवर जोरदार टीका करण्यात आली आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 26, 2024, 10:25 PM IST

प्रशांत जगताप

पुणे :Shivaji Adhalrao Patil Join NCP :लोकसभा निवडणुकीसाठी शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या विरोधात आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून शिवाजीराव आढळराव पाटील हे उमेदवार असणार असून, आज ते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पक्ष प्रवेश केला आहे. त्यांच्या या पक्ष प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने जोरदार टिका करण्यात आली आहे.

आयात उमेदवार घेण्याची वेळ : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, होय तेच (Shivaji Adhalrao Patil) शिवाजीराव आढळराव पाटील ज्यानी अजितदादा पवार, दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर अतिशय खालच्या पातळीवर टीका केली, राष्ट्रवादी संपवण्याची भाषा केली त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये उपलब्ध आहेत. त्यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याची नामुष्की अजितदाद पवार यांच्यावर आली, मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस सक्षम असती तर आयात उमेदवार घेण्याची वेळच आली नसती अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Sharad Pawar group) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी टीका केली आहे.

अजित पवारांना देखील चिमटे काढले : गद्दार आढळराव पाटलांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून मतदार निवडून देणार नाहीत. तर, कर्तुत्वान डॉक्टर अमोल कोल्हे पुन्हा खासदार होणार असा विश्वासही प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांचा आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला आहे. त्यानंतर बोलताना प्रशांत जगताप यांनी आढळराव पाटलांसह अजित पवारांना देखील चिमटे काढले आहेत.

आढळराव पाटील काय म्हणाले :महाविकासआघाडी सरकारच्या काळात मी अजित पवारांवर नव्हे तर उद्धव ठाकरेंवर टीका करायचो असा दावा आढळरावांनी केला आहे. आजचा प्रवेश ही घरवापसी अथवा लोकसभेच्या अनुषंगाने पर्याय नाही. तर नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी हे आम्ही उचलेलं पाऊल आहे. असं म्हणत अमोल कोल्हेंना पराभूत करण्याचं अजित पवारांनी दिलेलं आव्हान मी माझ्या खांद्यावर उचललं आहे, असा विश्वास आढळरावांनी व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details