पुणेSharad Pawar :शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा आज सकाळपासून सुरू होती. या चर्चेवर शरद पवार गटाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसमध्ये शरद पवार यांचा गट विलीन होणार नाही. शरद पवारांना घाबरणारे लोक अफवा पसरवत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय. उलट अशा पंतंग उडवणाऱ्यांपासून सावध राहा असा सल्ला त्यांनी पत्रकारांना दिला. शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी मोदी बागेत राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची आज बैठक झाली. या बैठकीला पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही :यावेळी माजी मंत्री आमदार अनिल देशमुख म्हणाले की, काँग्रेसमध्ये शरदचंद्र पवार गट विलीनीकरण होणार नाही. ही विरोधकांची पसरवलेली अफवा आहे. या बैठकीत महागाई तसंच पक्षाचं चिन्ह, मेळावे यावर चर्चा करण्यात आली. काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या बातम्या येत असल्या तरी आमचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही असं देखमुख म्हणाले.
आजच्या बैठकीत लोकसभा, राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. काँग्रेसमध्ये विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. माध्यमांतून अशा बातम्या आल्यानं काहीही होणार नाही.- रोहित पवार, आमदार