पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (22 डिसेंबर) पुण्यातील शिवाजीनगर येथील सिंचन नगर मैदानावर गेल्या दोन दिवसापासून सुरू झालेल्या भीमथडी जत्रेला हजेरी लावली. यावर्षी भीमथडी जत्रेचं हे 18 वं वर्ष आहे. यावेळी शरद पवार यांनी भीमथडी जत्रेतील स्टॉल्सची पाहणी केली. त्याचबरोबर राज्यातील आणि राज्याबाहेरुन येथे आलेल्या विक्रेत्यांशी त्यांनी संवाद साधला.
शरद पवारांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधत भीमथडी जत्रेबाबत माहिती दिली. यावेळी बोलताना पवार म्हणाले, "भीमथडी जत्रा अप्पासाहेब पवार यांना समर्पित आहे. यंदाचं 18 वं वर्ष असून राज्याबाहेरही भीमथडी जत्रेचं कौतुक होत आहे. या जत्रेला 21 जिल्ह्यातून महिला आल्या आहेत. बचत गट किंवा संस्थेच्या माध्यमातून स्टॉल घेत विशेष आकर्षण वस्तू, खाद्यपदार्थ, सामाजिक संदेश दर्शवण्याचं आयोजन या महिलांनी केलं आहे. 20 डिसेंबरपासून सुरू झालेल्या भीमथडी जत्रेचा 25 डिसेंबरपर्यंत लाभ घेता येणार आहे. दरम्यान, भीमथडी जत्रेतून शरद पवारांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याचं समोर आलं आहे.