मुंबई Palestine Supporting Matter: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचे परिणाम केवळ मध्यपूर्वेपुरता मर्यादित नसून आता त्याचा परिणाम भारतातही दिसू लागले आहेत. हमास-इस्रायल संघर्षावर पोस्ट टाकल्याप्रकरणी सोमय्या शाळेच्या प्राचार्या परवीन शेख यांच्यावर शाळा प्रशासनाने कारवाई केली आहे. सोमय्या शाळेच्या शाळेच्या मुख्याध्यापिका परवीन शेख यांनी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये हमासच्या समर्थनार्थ इस्लामिक कट्टरपंथियांबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती. याबाबत शाळा व्यवस्थापनाने त्यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. मात्र, परवीन शेख यांनी तसे करण्यास नकार दिला. त्यानंतर आता शाळा व्यवस्थापनाने त्यांना बडतर्फ करून परवीन शेख यांच्यावर कारवाई केली आहे.
शाळेने मागितला खुलासा :हमास-इस्रायल संघर्षावर पोस्ट टाकल्या प्रकरणी सोमय्या शाळेने शनिवारी त्याच्याकडे खुलासा मागितला होता. आमच्या एकता आणि सर्वसमावेशकतेच्या मूल्यांशी तडजोड होणार नाही. याची पालकांना आणि जनतेला खात्री देण्यासाठी व्यवस्थापनाने सोमय्या विद्याविहारशी परवीन शेख यांचा असलेला संबंध संपुष्टात आणल्याचे व्यवस्थापनाने म्हटले आहे.
काय म्हणाले शाळा व्यवस्थापन? :यासंदर्भात माहिती देताना व्यवस्थापनाच्या सदस्यांनी सांगितले की, आमच्या लक्षात आले आहे की, सोमय्या स्कूलमध्ये मुख्याध्यापक पदावर असलेल्या परवीन शेख यांच्या वैयक्तिक सोशल मीडियावरील भूमिका आमच्या मूल्यांशी जुळत नाहीत. सोमय्या विद्याविहार येथे, आम्ही असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतो जिथं सामाजिक जाणीव येते आणि समाजातील सर्व सदस्यांची उन्नती होते. क्षुल्लक विचारसरणी आणि वैयक्तिक पूर्वग्रहांच्यावर उठून आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचे समर्थन करतो. आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य ओळखतो पण, त्याचा इतरांसाठी जबाबदारी आणि आदराने वापर केला पाहिजे.