सातारा Satara Crime News : सातारा स्थानिक गुन्हे शाखेनं (एलसीबी) सराईत चोरट्यांकडून जिल्ह्यातील घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस आणत 24 लाख 50 हजार रुपये किमतीचे 37 तोळ्याचे दागिने हस्तगत केले आहेत. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून यात एका सोनाराचाही समावेश आहे.
साताऱ्यातील घरफोडीच्या पाच गुन्ह्यांत सोनारासह चौघांना अटक; 25 लाखांचे 35 तोळे दागिने हस्तगत - Crime News - CRIME NEWS
Satara Crime News : सातारा स्थानिक गुन्हे शाखेनं (एलसीबी) सराईत चोरट्यांकडून जिल्ह्यातील घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस आणले असून याप्रकरणी एका सोनारासह चौघांना अटक करण्यात आलीय.
Published : May 9, 2024, 10:33 PM IST
चार सराईत चोरट्यांना अटक : सातारा जिल्ह्यातील घरफोडींच्या गुन्ह्यांचा छडा लावून एलसीबीनं याप्रकरणी चार सराईत चोरट्यांना अटक केली आहे. सुनिल उर्फ सुशिल बबन भोसले, दीपक देवानंद मंजरतकर, राहुल हिरामण लष्करे आणि अजय एकनाथ चव्हाण अशी संशयितांची नावं आहेत. साताऱ्यातील बंद घरात प्रवेश करुन या चोरट्यांनी कपाटातील 9 लाख 29 हजार 500 रुपये किमतीचे 21 तोळे 6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे आणि रोख रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी सुनिल उर्फ सुशिल बबन भोसले यास अटक करुन 26 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या गुन्ह्यातील दुसऱ्या आरोपीकडून 17 लाख 50 हजार रुपये किमतीचे 25 तोळ्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
कराडमधील घरफोडीचा गुन्हा उघड : कराड तालुक्यातील गोटे गावातील बंद घरातून 15 फेब्रुवारी रोजी पहाटे 65 हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले होते. त्याचाही छडा लावण्यात एलसीबीला यश आलंय. याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातून राहुल हिरामण लष्करे आणि अजय एकनाथ चव्हाण या सराईत चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. याच आरोपींकडून अन्य तीन गुन्हेही उघडकीस आले आहेत. तीन गुन्ह्यांत चोरीला गेलेले एकूण 7 लाख रुपये किंमतीचे 10 तोळ्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
दोन वर्षात चार कोटी सात लाखांचा ऐवज जप्त : स्थानिक गुन्हे शाखेनं नोव्हेंबर 2022 पासून आतापर्यंत दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, मोटार सायकल चोरीसह मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यात एकूण कोटी 7 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवलंय.
हेही वाचा :