बीड: बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फाशी झाली पाहिजे, वाल्मिक कराडला अटक झालीच पाहिजे, धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे या मागण्यांसाठी बीडमध्ये आयोजित आक्रोश मोर्चात लाखोंच्या संख्येनं लोक सहभागी झाले होते.
आमदार, खासदार रस्त्यावर :संतोषला न्याय द्या, वाल्मिकला अटक करा, वाल्मिक कराडच्या संपत्तीची चौकशी करा अशी पोस्टर घेऊन महिला, पुरुष या मोर्चात सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीमहाराज, मनोज जरांगे पाटील, खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार प्रकाश सोळंके, आमदार अभिमन्यू पवार, आमदार जितेंद्र आव्हाड, नरेंद्र पाटील यांच्यासह नेते कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.
बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा (ETV Bharat Reporter)
वाल्मिक कराडला आधी आत टाका :विंडमिलच्या प्रकरणात वॉचमॅन हा बौद्ध आणि संतोष हा मराठा होता. वाल्मिक कराडचे गुंड तिथं गेल्यावर संतोष देशमुख तिथे गेले. जातीपातीचं राजकारण करणाऱ्यांना हे सांगा मी ओबीसी आहे तरी म्हणतो या वाल्मिक कराडला आधी आत टाका. मी विरोधात असलो तरी मंचावर उपस्थित असलेले सुरेश धस भाजपामध्ये आहेत. प्रकाशदादा सोळंके अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत, तरी ते छाती ठोकून सांगतायत आत टाका. आज आमदार अभिमन्यू पवार तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत. तरी अभिमन्यू पवारांना विषय कळताच पाठिंबा दिला, असं संदीप क्षीरसागर म्हणाले.
भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार काय म्हणाले? : कोपर्डीत ज्या पद्धतीने मोर्चा निघाला, संतोष देशमुख हत्ये विरोधात देखील राज्यभरात मोर्चा निघाले. दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. वाल्मिक कराड असो किंवा कोणीही असो, कितीही मोठा आरोपी असला तरी त्याला शिक्षा झाली पाहिजे. या मोर्चाची दखल सरकारने घ्यावी, असं अभिमन्यू पवार यांनी सांगितलं.
तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे :संदीप क्षीरसागर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना सोडणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं. सभागृहात ज्या पद्धतीने सुरेश धस बोलले. अजून पाच मिनिटं बोलले असते तर सभागृह रडलं असतं. मोर्चात हिंदू, मुस्लिम, बौद्ध आणि अठरा पगड जातींचे लोक माणूस म्हणून आले होते. या वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात अजून अटक नाही, त्याचा गुन्ह्यात थेट संबंध लागतो तरी त्याचं नाव नाही, अशी टीकाही संदीप क्षीरसागर यांनी केली. वाल्मिक कराडला संरक्षण धनंजय मुंडे याचं असल्याचं बोललं जातं. वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे. फास्ट ट्रॅकमध्ये केस चालली पाहिजे. जोपर्यंत तपास होत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी देखील संदीप क्षीरसागर यांनी केली.
वाल्मिकचा वाल्या झाला-जितेंद्र आव्हाड : जाती आपण कधी सोडणार आहोत? संतोष देशमुख जातीसाठी मेला नाही. बीड हा पुरोगामी जिल्हा ओळखला जातो. वाल्मीक नाही तो वाल्या आहे. त्रेतायुगात वाल्याचा वाल्मीक झाला आणि कल्युगात वाल्मीकचां वाल्या झाला. लोक म्हणतात वंजाऱ्याच्या विरोधात बोलतायत माणुसकी आहे का त्याला? आंधळे यांचा खून झाला ते पण वंजारी होते. अशोक सोनवणेंची अट्रोसिटी दाखल झाली असती तर देशमुखांचा खून झाला नसता. या सर्वाला पोलीस अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. संतोष मेल्यावर तुम्ही जिवंत झाला. बीड हा बंडखोरांचा जिल्हा आहे. राजकीय बंडखोरी करणारा आहे. बीडने गोपीनाथ मुंडे, नाना पाटील अनेक जण दिले. एकी अशीच ठेवा की बीडमध्ये ठिणगी पडली आहे. याचे जनआंदोलन होईल. अटक झाली नाही तर महारष्ट्रमध्ये आग पेटेल, असं आव्हाड यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा -
- सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी; आरोपांनंतर प्राजक्ता माळीचं सणसणीत उत्तर, महिला आयोगात तक्रार
- बीड सरपंच हत्या प्रकरणात राजकीय वातावरण तापलं, सुरेश धस आणि वाघमारे यांनी केली टीका
- संतोष देशमुख हत्या प्रकरण: खाते वाटपापूर्वीच धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ? सुरेश धस नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर