नवी दिल्ली- "सध्याची परिस्थिती पाहता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे पक्ष राहतील की नाही शंका आहे. ते आरएसएस बौद्धिकाला उपस्थित राहणार आहेत. याहून अध:पतन काय?", असा टोला शिवेसनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी लगावला. "दिल्लीतून दोघांनाही बौद्धिक मिळते," असेही राऊत यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदेंसह अजित पवारांचे पक्ष राहतील की नाही, याची शंका- संजय राऊत - SANJAY RAUT TODAY NEWS
महायुतीच्या मंत्रिमंडळातील विस्तारानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीतील नाराजी समोर आली आहे. त्यावरून शिवसेनेचे खासदार (यूबीटी) संजय राऊत यांनी महायुतीवर निशाणा साधला. ते माध्यमांशी बोलत होते.
Published : 5 hours ago
खासदार संजय राऊत म्हणाले, " भाजपाचं केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून राजकारण सुरू आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे पक्ष राहतील की नाही, याबाबत शंंका वाटते. कोण दादा, कसला दादा, असे छगन भुजबळ म्हणालेत. छगन भुजबळांबद्दल मला पहिल्यापासून सहानुभूती आहे. त्यांचे वय ७९ वर्षे आहे. ते लढवय्या आहेत. बेळगावात जाऊन त्यांनी लढा दिला होता. बेळगाव पोलिसांनी त्यांचे डोके फोडले होते. ते मैदानातून कधीही पळत नाही. ज्यांना मंत्रिपद मिळाली नाहीत, त्यांच्याकडे निष्ठा दिसत नाहीत. मंत्रिपद मिळालं नाही म्हणून रडारड सुरू आहे. शिवेसनेतील काहीजण बॅग भरून गेले"
- संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंसह अजित पवारांवर निशाणा साधला. ते म्हणाले, " अजित पवार यांचा पक्ष नसून गट आहे. त्यांना आणि एकनाथ शिंदे गटाला कोणतीही विचारसरणी नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष आहे. त्यांना विचारसरणी आहेत. ते कधीही मोदीबागेत जाणार नाहीत".
"संसदेत एक राष्ट्र- एक निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आलं. त्यात बहुमतापेक्षा भाजपाला मते कमी मिळाली आहेत. हा त्यांचा नैतिक पराभव आहे. व्हीप न पाळण्याकरिता भाजपाच्या स्वाभिमानी नेत्यांनी दाखविली. वन नेशन वन इलेक्शनला आम्ही विरोध केला आहे. त्यामधून संघराज्य संपविण्याचे प्रयत्न सुरू आहेत," असा आरोप संजय राऊत यांनी केला.