खासदार संजय राऊत (ETV Bharat) मुंबई Sanjay Raut On Eknath Shinde :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर भाष्य केलं. उद्धव ठाकरे यांना शिवसेना ताब्यात घ्यायची होती. त्यामुळेच राज ठाकरे यांना शिवसेना सोडावी लागल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चांगलाच हल्लाबोल केला. "आपण नमक हराम 2 हा चित्रपट काढणार असून कता, पटकथा मी देणार आहे, असं सांगितलं. आगामी विधानसभा निवडणुका या आता डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर देखील संजय राऊत यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज ठाकरे बाहेर पडण्याचं कारण :"राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडावं अशी बाळासाहेबांची इच्छा नव्हती. पण, उद्धव ठाकरे यांना अनेक वर्षांपासून मुख्यमंत्री व्हायचं होतं. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच राज ठाकरे यांना शिवसेना सोडावी लागली," असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. याबाबत पत्रकारांनी खासदार संजय राऊत यांना विचारणा केली असता, त्यांनी शिवसेनेसह भाजपावर देखील टीका केली. "एकनाथ शिंदे ज्यांच्या नादाला लागले आहेत, ते सगळे ढोंगी आहेत' असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. "लांडगे आणि कोल्ह्यांच्या कळपात शिरल्यावर काय होणार?" असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खोटं बोलत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे केवळ ठाण्यापूरते मर्यादित होते :"राज ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना सोडली, त्यावेळी बैठका सुरू होत्या, त्या बैठकांना बाळासाहेबांसोबत मी उपस्थित होतो. त्या काळात एकनाथ शिंदे केवळ ठाण्यापूरते मर्यादित होते. ठाण्यातील महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा एवढ्या पूरतेच एकनाथ शिंदे यांचं अस्तित्व होतं. त्यामुळे राज ठाकरेंबाबत जेव्हा बैठका सुरू होत्या, त्या बैठकांमध्ये काय चर्चा होत आहेत, याची माहिती त्यांना नाही. एकनाथ शिंदे त्यावेळेला ठाण्यात होते. त्यांना मातोश्री आणि मुंबईत काही करता येत नव्हतं. त्यामुळे त्यांना काय घडलं माहीत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या निर्माते देखील झाले आहेत. एक दोन चित्रपट काढत आहेत. मला देखील असा एखादा चित्रपट काढावासा वाटतो. नमक हराम 2 हा चित्रपट मी काढेल आणि त्याची कथा पटकथा मी देईल" अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. या संदर्भात 'ईटीव्ही भारत'नं राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
हेही वाचा :
- "अनिल देशमुख आणि मी नागपूरमुळंच..."; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा - Sanjay Raut
- अजित पवार हे घरातच कुस्ती खेळणार; संजय राऊतांचा टोला - Sanjay Raut
- आमचं सरकार आल्यावर आम्ही लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये देऊ - संजय राऊत - Sanjay Raut