महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साईंबाबांच्या देणगीत पाच वर्षांत तब्बल इतक्या टक्क्यांची वाढ, आकडे ऐकून धक्काच बसेल - SHIRDI DONATION

मागील वर्षापेक्षा 15.64 कोटींची वाढ झालीय. तर साईबाबा संस्थानची विविध बँकांतील गुंतवणूक 2916 कोटीवर पोहोचलीय. गतवर्षीच्या तुलनेत 316 कोटींची गुंतवणुकीत भर पडलीय.

Shirdi Sai Sansthan Donation
शिर्डी साई संस्थान देणगी (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 22, 2024, 1:01 PM IST

शिर्डी-देश-विदेशातील करोडो साईभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी येथील साईबाबा समाधी मंदिरात वर्षभरात 3 कोटींहून अधिक भाविकांनी माथा टेकवत साईचरणी लीन होत साईंच्या झोळीत तब्बल 451 कोटींची दक्षिणा अर्पण केलीय. तर विविध माध्यमातून 2023-24 आर्थिक वर्षात तिजोरीत 819 कोटी 57 लाखाचे उत्पन्न जमा झालंय. मागील वर्षापेक्षा 15.64 कोटींची वाढ झालीय. तर साईबाबा संस्थानची विविध बँकांतील गुंतवणूक 2916 कोटीवर पोहोचलीय. गतवर्षीच्या तुलनेत 316 कोटींची गुंतवणुकीत भर पडलीय.

साईबाबा संस्थानच्या 2023-24 वार्षिक अहवालास शुक्रवारी नागपूर येथील राज्य विधिमंडळात मान्यता देण्यात आलीय. या वार्षिक अहवालात वर्षभरात भाविकांना पायाभूत सुविधांवर साईसंस्थानकडून 289 कोटी 48 लाख खर्च करण्यात आलेत. गतवर्षीच्या तुलनेत 91 कोटी 48 लाख रुपयांची वाढ झालीय. सर्वाधिक खर्च 141 कोटी 17 लाख हा आरोग्य सुविधांवर करण्यात आलाय. यातून 9 लाख 19 हजार 893 रुग्णांवर उपचार करण्यात आलेत. तर आशियातील सर्वात मोठे असलेल्या साईसंस्थानच्या भोजन प्रसादालयावर 93 कोटी 11 लाख खर्च करण्यात आलेत. त्यातील वर्षभरात 1 कोटी 58 लाख 82 हजार 959 भाविकांनी मोफत प्रसादाचा लाभ घेतलाय. साईसंस्थानच्या भक्तनिवासात सुमारे 33 लाख 6 हजार 807 भाविकांनी वर्षभरात निवास व्यवस्थेचा लाभ घेतलाय. भाविकांना सुकर आणि जलद दर्शनासाठी साईसंस्थानकडून दिल्या जाणाऱ्या सशुल्क दर्शन आरती पासेसचा वर्षभरात 30 लाख भाविकांनी लाभ घेतलाय. त्यातील साईंच्या झोळीत 60 कोटी एवढ्या उत्पन्नाची भर पडलीय.

वर्ष उत्पन्न (कोटी) खर्च(कोटी) गुंतवणूक
2019-20 698.99 689.42 2242.95
2020-21 300.78 345.30 2237.03
2021-22 436.95 347.73 2316.08
2022-23 803.93 470.28 2570.00
2023-24 819.57 489.36 2916.00
देणगी रूपाने मिळलेले उत्पन्न कोटीत
वर्ष विशेष स्वरूपाची देणगी (कोटी) इतर देणगी (कोटी)
2019-20 102.93 258.93
2020-21 45.52 61.42
2021-22 80.34 124.45
2022-23 151.20 328.96
2023-24 143.63 307.39
साईभक्तांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधांवर झालेला खर्च (कोटी)
वर्ष पाणीपुरवठा(कोटी) स्वच्छता(कोटी) निवासव्यवस्था(कोटी) प्रसादालय (कोटी) शैक्षणिक सुविधा(कोटी) वैद्यकीय सुविधा(कोटी)
2019-20 1.78 3.00 28.35 76.24 13.95 122.39
2020-21 0.48 2.79 25.05 75.23 16.16 133.39
2021-22 0.40 13 .79 8.90 19.33 13.79 92.54
2022-23 0.88 0.16 25.73 27.99 19.45 123.92
2023-24 1.92 0.29 31.58 93.11 21.54 141.17

हेही वाचा :

  1. गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त 18 जपानी साईभक्त महिला शिर्डीत; दर्शनानंतर काय म्हणाल्या? पाहा व्हिडिओ - Japanese In Shirdi
  2. धनंजय मुंडे साई चरणी लीन; 'या' विषयावर दिली प्रतिक्रिया - Dhananjay Munde

ABOUT THE AUTHOR

...view details