लखमी गौतम यांची पत्रकार परिषद मुंबईSalman Khan House Firing :बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर केलेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. सागर पाल (25), विकी गुप्ता (21) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून त्यांना गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील लखपत तालुक्यातील माता नो मठ मंदिरातून अटक केलीय. दोन्ही आरोपींना किल्ला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं आरोपींना 25 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, असं गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त लखमी गौतम यांनी सांगितलं.
आरोपींविरुद्ध वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा :दोन्ही आरोपी मुळचे बिहारमधील चंपारण्य येथील रहिवासी असून ते 28 फेब्रुवारीला मुंबईत आले होते. सलमान खानच्या अंगरक्षकाच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोन्ही आरोपींवर कलम 307, 34, 120B शस्त्रास्त्र कायदा कलम 3, तसंच 25 नुसार गुन्हा दाखल कण्यात आलाय. दरम्यान, या गुन्ह्याची जबाबदारी अनमोल बिष्णोई नावाच्या इसमानं फेसबुकवर पोस्ट टाकून घेतलीय. त्यामुळं त्याबाबत देखील तपास सुरू आहे.
या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन हा गुन्हा, गुन्हे शाखेकडं वर्ग करण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासासाठी गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची एकून 12 पथकं तयार करण्यात आली होती. पोलिसांनी तांत्रिक बाबींचा वापर करून आरोपींना गुजरातमधून बेड्या ठोकल्या आहेत. सागर पालनं सलमानच्या घरी गोळीबार केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलय. सागर पाल हा यापूर्वी कामानिमित्त हरियाणात गेला होता. तिथं तो बिश्नोई गँगच्या संपर्कात आला. तसंच विकी गुप्ताही कामानिमित्त हरियाणाला गेला होता. तिथं त्याची भेट सागर पाल सोबत झाली. सागर पाल यानच विक्कीची ओळख बिश्नोई गँगशी करून दिली. आरोपी सागर पाल दोन वर्षांपासून हरियाणात काम करतोय. दोन्ही आरोपी नवी मुंबईतील सलमान खानच्या फार्महाऊसपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या फ्लॅटमध्ये राहात होते. दोघांनीही 11 महिन्यांसाठी भाडेतत्त्वावर 1 बीएचके फ्लॅट घेतला होता, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.
हे वाचलंत का :
- मुंबईला पैसे कमविण्याकरिता...सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपींच्या पालकांनी काय दिली प्रतिक्रिया? - Salman Khan House Firing Case
- सलमान खान गोळीबार प्रकरण; 1 महिन्यापासून पनवेलमध्ये राहत होते आरोपी; गुजरातमधून हलली गोळीबाराची सूत्रे - Salman Khan Firing Incident
- महाराष्ट्रात गोळीबारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ; का होतायेत गोळीबार? कोण जबाबदार? - Firing Cases In Maharashtra