नागपूरRSS Karyakarta Vikas Varg:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यायंदाच्या कार्यकर्ता विकास वर्गात एकूण ९३६ शिक्षार्थी सहभागी झाले आहेत. देशभरातील प्रांतांमधून आलेल्या शिक्षार्थींना संबोधित करताना पराग अभ्यंकर म्हणाले, "संघ कार्य जाणून घेण्यासाठी आणि ते आचरणात आणण्यासाठी नागपूरला जाण्याचे सौभाग्य मिळावे असे प्रत्येक स्वयंसेवकाला वाटत असते. संघकार्य हे जीवनकार्य व्हावे, ही भावना स्वयंसेवकांच्या मनात कायम असते. ही भूमी डॉ. हेडगेवार आणि गुरुजींची तपोभूमी आहे. संघकार्यात प्रशिक्षण वर्गाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे संघाचे जसजसे काम वाढत गेले तसतसे विविध प्रांतांमध्ये प्रशिक्षण वर्ग घेण्यास सुरुवात झाली. स्वातंत्र्यापूर्वी अनेक आव्हाने होती."
केवळ दोन वेळा प्रशिक्षण खंडित झाले :त्या काळात संघाने देशाच्या स्वातंत्र्यासाठीही काम केले. जंगल सत्याग्रहात डॉ. हेडगेवारांचा सक्रिय सहभाग घेतला होता. बंदीचा काळ आणि कोरोनाचा काळ वगळता संघाचे प्रशिक्षण वर्ग कधीही खंडित झाले नाहीत. काळानुरूप प्रशिक्षण वर्गाचा कालावधी आणि अभ्यासक्रम यात बदल करण्यात आला. कार्यकर्त्यांची विचारसरणी काय असावी, त्याच्यासमोरील आव्हाने काय आहेत हे लक्षात घेऊन व्यवस्थेत बदल करण्यात आले, असं पराग अभ्यंकर यांनी सांगितलं.