मुंबईRamdas Athawale About BJP :लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. मुंबई मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. महायुती सोबत असलेल्या घटक पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी सध्या महायुतीचे उमेदवार घेत असल्याचे चित्र आहे. त्यातच महायुतीच्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या शिंदे शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी आरपीआय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. यावेळी माध्यमाशी बोलताना लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी भाजपाकडून ऑफर आली असती तर आपण कमळ चिन्हावर लोकसभा निवडणूक लढलो नसल्याचे विधान रामदास आठवले यांनी केले आहे.
महादेव जाणकार यांचं वक्तव्य योग्यच :महायुतीच्या जगावाटपाच्या दरम्यान रासपाचे महादेव जाणकर म्हणाले होते की, मी राजकारणातून बाहेर जरी गेलो तरी कमळ, धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक न लढवता माझ्या चिन्हावरच निवडणूक लढेल. यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले की, महादेव यांचे स्टेटमेंट योग्यच आहे. त्यांचा राष्ट्रीय समाज पक्ष नावाचा स्वतंत्र पक्ष आहे. मी जेव्हा काँग्रेस सोबत होतो तेव्हा काँग्रेस पक्षाचे चिन्ह न घेता माझ्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवून जिंकून आलो होतो. राज्यसभेवर आरपीआय पक्ष म्हणूनच मी आहे. त्यामुळे जाणकार यांच्या मताशी आपण सहमत असल्याचे आठवले म्हणाले आहे. भाजपाकडून कमळाच्या चिन्हावर लढावे अशी कोणतीही ऑफर देण्यात आली होती का? यावर आठवले म्हणाले की, अशी कोणतीही ऑफर नव्हती. त्यांना माहिती आहे मी कमळ चिन्हावर लढलो नसतो. आमचा भाजपाला पाठिंबा आहे. मात्र अशा प्रकारची चर्चा झाली नसल्याचं आठवले म्हणाले.
राज्याबाहेर जाणाऱ्या उद्योगांसाठी आराखडा करणे आवश्यक :उद्योगधंदे राज्यबाहेर गेले. त्यात वेदांत, टाटा एअर बस, फॉक्सकोन सारखे प्रकल्प गुजरातला गेले. आता महानंदा डेअरी प्रकल्प माध्यमातून रोजगार जात आहे. यावर रामदास आठवले म्हणाले की, काही अडचणींमुळे बाहेर गेले असतील; मात्र मुंबईत देखील मोठ्या प्रमाणात उद्योग या ठिकाणी आलेले आहे. त्यावेळी इतर राज्यातील लोक म्हणाले नाही की, इतके उद्योग मुंबईला आले. मुंबई इकॉनॉमिकल कॅपिटल आहे. उद्योग राज्याबाहेर जात असतील तर ज्या उद्योगपतींना फॅसिलिटी द्यायची आहे, त्या फॅसिलिटी संदर्भात एखादा आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे. यासाठी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सोबत चर्चा करेल. महाराष्ट्रातील कुठलाही उद्योग महाराष्ट्रा बाहेर जाता कामा नये. यासाठी महायुतीचे सरकार प्रयत्न करेल, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
रामदास आठवले नाराज असल्याच्या चर्चा :लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुतीचे घटक पक्ष आपल्या पक्षाला जागा मिळाव्यात म्हणून प्रयत्न करत होते. आरपीआयकडून शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी आग्रह होता. तो शिंदे-शिवसेना पक्षाकडे असल्यामुळे कार्यकर्त्यांची मागणी वाढत होती. आपली नाराजी दूर झाली असून आपण महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सक्रिय झालो असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :
- संजय राऊतांची पुन्हा जीभ घसरली, मोदींविरुद्ध केलं वादग्रस्त विधान, भाजपाची पोलिसात तक्रार - Sanjay Raut Controversial Statement
- साताऱ्यातील घरफोडीच्या पाच गुन्ह्यांत सोनारासह चौघांना अटक; 25 लाखांचे 35 तोळे दागिने हस्तगत - Crime News
- महाविकास आघाडीला राज्यात किती जागा मिळतील? शरद पवारांनी सांगितला थेट आकडाच! - Lok Sabha Election 2024