पुणे : राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणूक 2024 आज मतदान पार पडत असून मोठ्या उत्साहात नागरिक मतदान करताना पाहायला मिळत आहे. राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदार संघात काका विरुद्ध पुतणे अशी लढत होताना पाहायला मिळत आहे. अश्यातच आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी अजित पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या बिटकॉईन प्रकरणावर भाष्य केलं.
अजित पवार यांनी केलं सहकुटुंब मतदान : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी आज सकाळी 7 वाजता काटेवाडी येथील मतदान केंद्रात जाऊन मतदान केलं. यावेळी जय पवार यांचीही त्यांच्यासोबत उपस्थिती होती. मतदान केल्यानंतर अजित पवार यांनी माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधला.
महाराष्ट्राची घौडदौड अशीच सुरू राहील : माध्यम प्रतिनिधींसोबत बोलताना अजित पवार म्हणाले की, "आज राज्यात 288 मतदार संघात मतदान होत असून त्या मतदार संघात योग्य उमेदवाराला राज्याच्या जनतेनं मतदान करून विजयी करावं. महाराष्ट्राची घौडदौड अशीच पुढं राहील यासाठी प्रयत्न करावा. या विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालात राज्याचं चित्र हे अतिशय सकारात्मक राहील," असं यावेळी अजित पवार म्हणाले.
सुप्रिया सुळे यांच्या बिटकॉईन प्रकरणावर म्हणाले व्हिडिओ पाहुन बोलतो : सुप्रिया सुळे यांच्यावर माजी आयपीएस अधिकाऱ्यांनी बिटकॉईन प्रकरणी आरोप केले आहेत. या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता, "त्यांनी आपण सध्या निवडणुकीच्या गडबडीत आहोत, त्यामुळे तो आरोपाचा व्हिडिओ पाहिला नाही. व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण यावर बोलू," असं त्यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितलं.
हेही वाचा :