हैदाराबाद : व्होल्वोनं अधिकृतपणे आपली XC40 रिचार्ज इलेक्ट्रिक SUV EX40 पुन्हा लॉंच केलीय. हे नाव यावर्षी फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावर देण्यात आलं होतं. Volvo C40 Recharge coupe SUV चे नाव देखील EC40 बदललं जाऊ शकतं, अशी अपेक्षा आहे. व्होल्वो EX40 फक्त रीअर-व्हील ड्राइव्ह आणि 69kWh बॅटरी पॅकसह सुसज्ज आहे, जे 475Km ची रेंज देण्यास सक्षम आहे. त्याची किंमत Volvo XC40 रिचार्जपेक्षा 1.15 लाख रुपये जास्त आहे.
Volvo EX40 मध्ये नवीन काय असेल? : Volvo EX40 च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झाले तर, यात पिक्सेल एलईडी हेडलॅम्प, 12-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 9-इंच इंफोटेनमेंट सिस्टम, 19-इंच अलॉय व्हील, पॉवर्ड फ्रंट सीट्स, 2-झोन क्लायमेट कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय इलेक्ट्रिक कार पार्क असिस्ट, पॅनोरामिक सनरूफ, हरमन कार्डन साउंड सिस्टीम, वायरलेस फोन चार्जिंग, 360-डिग्री कॅमेरा उपलब्ध आहेत.
जुन्या मॉडेलवर सूट : आता तिच्या किंमतीबद्दल बोलायचं झाल्यास, कंपनीनं नवीन Volvo EX40 ची एक्स-शोरूम किंमत 56.10 लाख रुपये निश्चित केली आहे. तसंच XC40 रिचार्जची एक्स-शोरूम किंमत 54.95 लाख रुपये होती. दुसरीकडं, Volvo C40 Recharge मध्ये ड्युअल-मोटर सेटअप आहे. यात 78kWh चा बॅटरी पॅक मिळतो. कंपनी या मॉडेलवर 1.05 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे. XC40 रिचार्ज अजूनही Volvo च्या स्टॉकमध्ये उपलब्ध आहे. आपला स्टॉक पूर्ण करण्यासाठी, कंपनी ग्राहकांना 5.05 लाख रुपयांपर्यंत सूट देखील देत आहे. ही ऑफर फक्त सिंगल-मोटर मॉडेलवर उपलब्ध आहे. दुहेरी-मोटर सुसज्ज मॉडेल आधीच विकले गेले आहे.
हे वाचलंत का :