महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती नागपूर महामार्गावर थरार; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण करत लुटलं, कर्मचारी गंभीर जखमी - प्राणघातक हल्ला

Robbers Loot petrol Pump : अमरावती नागपूर द्रुतगती महामार्गावर तिवसा शहरालगत असलेल्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला चोरट्यांनी मारहाण केली. यावेळी या चोरट्यांनी कर्मचाऱ्याकडील 9 हजार रुपये पळविल्याची घटना समोर आलीय.

अमरावती नागपूर महामार्गावर पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण करत लुटलं; कर्मचारी गंभीर जखमी
अमरावती नागपूर महामार्गावर पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण करत लुटलं; कर्मचारी गंभीर जखमी

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 1, 2024, 9:29 AM IST

अमरावती Robbers Loot petrol Pump : पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण करुन त्याच्या जवळ असणारे 9000 रुपये चोरट्यांनी पळविल्याटची घटना समोर आलीय. ही घटना अमरावती नागपूर द्रुतगती महामार्गावर तिवसा ते गुरुकुंज मोझरी दरम्यान असणाऱ्या पेट्रोल पंपावर घडली. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडालीय. दरम्यान ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद झालीय.



पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर कोयत्यानं हल्ला : अमरावती नागपूर द्रुतगती महामार्गावर तिवसा लगत संजय मोकार यांच्या मालकीचं कृष्णा पेट्रोल पंप आहे. बुधवारी मध्यरात्री चार अज्ञात व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून पेट्रोल पंपाच्या मागच्या दिशेनं आले आणि या चौघांनी पेट्रोल पंपावरील कर्मचारी किशोर गुल्हाने यांच्यावर कोयत्यानं हल्ला चढवला. यात ते गंभीर जखमी झाले. यानंतर चोरट्यांनी किशोर गुल्हाने यांच्या जवळ असणारे नऊ हजार रुपये रोख तसंच त्यांचा मोबाईल घेऊन पसार झालेत. चोरट्यांनी यावेळी पेट्रोल पंपावरील संगणकाची देखील तोडफोड केली.

घटना सीसीटीव्हीत कैद : दरम्यान चोरट्यांनी तिवसालगतच्या कृष्णा पेट्रोल पंपावर घातलेला धुमाकूळ पेट्रोल पंपावर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. पेट्रोल पंपावरील जखमी कर्मचारी किशोर गुल्हाने यांनी दिलेल्या तक्रारीवरुन तिवसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. "पोलीस चोरट्यांचा शोध घेत असून हे चोरटे लवकरच पकडले जातील," असं तिवसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश मस्के यांनी सांगितलंय. मात्र या घटनेमुळं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

गुन्हेगारीत वाढ : गेल्या काही दिवसात राज्यात गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येतंय. शुल्लक कारणांवरुन थेट प्राणघातक हल्ला करण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येतंय. काही दिवसांपूर्वीच नाशिकातील एका डॉक्टरवर धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.

हेही वाचा :

  1. साऊथ अभिनेत्री सौम्या जानूचा ट्रॅफिक होमगार्डवर हल्ला, रस्त्यातील राड्याचा व्हिडिओ व्हायरल
  2. नाशिकमध्ये डॉक्टरवर तरुणाचा प्राणघातक हल्ला; कोयत्यानं 15 ते 18 वार करुन आरोपी फरार
  3. उपराजधानी बनतेय गुन्हेगारांची राजधानी? माजी नगरसेवकावर 8 ते 10 जणांचा प्राणघातक हल्ला

ABOUT THE AUTHOR

...view details