महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रिक्षा चालकांच्या नियमाविरुद्ध आडम मास्तर आक्रमक : मुख्यमंत्र्यांना आषाढी वारीत घेराव घालण्याचा दिला इशारा - CM Eknath Shinde

Narasayya Adam On CM Eknath Shinde : फिटनेस प्रमाणपत्र नसलेल्या रिक्षांना दंड लागू केल्यामुळं रिक्षा चालक संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. जर मागण्या मान्य झाल्या नाही तर रिक्षावाले १६ जुलै रोजी आषाढी वारीत (Ashadhi Wari 2024) मुख्यमंत्र्यांना घेराव घालणार असल्याचा इशारा, माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिला आहे.

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 3, 2024, 7:42 PM IST

Narasayya Adam On CM Eknath Shinde
रिक्षावाले घालणार पंढरपूरात एकनाथ शिंदेंना घेराव (ETV Bharat Reporter)

सोलापूर CM Eknath Shinde :सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी रिक्षावाल्यांनी भव्य मोर्चा काढला होता. राज्यातील रिक्षांना फिटनेस प्रमाणपत्राची नियमावली केली आहे. फिटनेस प्रमाणपत्र देताना विलंब झालेल्या रिक्षांना एका दिवसांसाठी पन्नास रुपये दंड आकारला जात आहे. तुटपुंज्या कमाईवर रिक्षावाले हलाखीचं आयुष्य जगत असताना सरकार असे नियम लादून रिक्षावाल्यांना अडचणीत आणल्याची खंत, मोर्चात सहभागी झालेले माजी आमदार नरसय्या आडम, रिक्षावाले, वाहतूक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष रियाज सय्यद यांनी व्यक्त केलीय.

प्रतिक्रिया देताना माजी आमदार नरसय्या आडम (ETV Bharat Reporter)

मुख्यमंत्री शिंदेंना घालणार घेराव :काही दिवसात पंढरपुरात आषाढी वारीचा (Ashadhi Wari 2024) सोहळा साजरा होणार आहे. वारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरात येणार आहेत. सोलापुरातील सर्व रिक्षावाले पंढरपूर येथे वारीत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घेराव घालणार असल्याची माहिती, रिक्षाचालकांनी दिली आहे.

जाचक नियमाविरुद्ध आडम मास्तर आक्रमक : रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसाठी सोलापूर शहरांमध्ये रिक्षा चालक आणि वाहतूक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं रिक्षा चालकांच्या योग्यता प्रमाणपत्र आणि विलंब शुल्कबाबत मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी आमदार नरसय्या आडम यांनी भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना इशारा दिलाय. विलंब शुल्क माफीचा निर्णय झाला नाही तर, मुख्यमंत्र्यांना पंढरपूरातून बाहेर जाऊ देणार नाही. पोलीस प्रशासन कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी, आम्ही थांबणार नाही असा ठाम निर्णय नरसय्या आडम आणि वाहतूक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष रियाज सय्यद यांनी घेतला आहे.

सरकारकडून कल्याणकारी महामंडळ स्थापन : 18 जून रोजी राज्य सरकारनं ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन केले आहे. यासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. दरम्यान, जे रोज रोजंदारीवर काम करतात अशा गोर-गरिबांसाठी या कल्याणकारी महामंडळाची स्थापना करण्यात आलीय. तसेच राज्यातील टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्या मुलांसाठी स्किल डेव्हलपमेंट करण्यात येईल. यासाठी जर्मनीसोबत आम्ही रोजगाराबाबत करार केलाय. यात चार लाख तरुणांना तिथे रोजगार मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. ऑटो रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी खुशखबर; सरकारकडून कल्याणकारी महामंडळ स्थापन, किती कोटी रुपयांची तरतूद? - Eknath Shinde On Rickshaw Taxi
  2. कोणी धंदा देता का धंदा...! रिक्षा जास्त झाल्यानं रिक्षा चालकच प्रवाशांच्या प्रतीक्षेत - Rickshaw driver
  3. मुख्यमंत्र्यांच्या आशेवर आम्ही जगतो; आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनी पालखीत व्यक्त केल्या भावना - Ashadhi Wari

ABOUT THE AUTHOR

...view details