महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"राज्यात वाळू माफियांना पायबंद घालू", महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा - CHANDRASHEKHAR BAWANKULE

देशातील सर्वात चांगला महसूल विभाग महाराष्ट्राचा असेल, अशी ओळख निर्माण करणार, असं नुतन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

CHANDRASHEKHAR BAWANKULE
चंद्रशेखर बावनकुळे (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 22, 2024, 7:44 PM IST

नागपूर :जनतेसाठी त्रासदायक ठरलेल्या महाराष्ट्रातील वाळू माफियागिरीला पायबंद घालण्यासाठी सरकार विशेष लक्ष देईल. वाळू विषयक सुलभ धोरण आणू, अशी घोषणा राज्याचे नवनियुक्त महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. "जनतेला वाळू सहज उपलब्ध होईल, असं सुलभ धोरण देशातील कोणत्या राज्यात आहे, त्यासंदर्भात अभ्यास करून महाराष्ट्रात वाळूविषयक सुलभ धोरण अस्तित्वात आणू," असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

सर्वात चांगला महसूल विभाग महाराष्ट्राचा असेल : "महसूल विभागामुळं जनतेला त्रास होतोय, हे मी पाहू शकत नाही. 'जनता सर्वोपरी' असं आपलं कामकाजाचं धोरण राहणार असून देशातील सर्वात चांगला महसूल विभाग महाराष्ट्राचा असेल अशी ओळख मी निर्माण करेन," असा निर्धार बावनकुळे यांनी व्यक्त केला.

चंद्रशेखर बावनकुळे (Source - ETV Bharat Reporter)

झुडपी जंगल जमिनींचा प्रश्न मार्गी लावणार : "राज्यात सुमारे 86 हजार हेक्टर झुडपी जंगल जमिनींचा प्रश्न प्रलंबित आहे. यामुळं अनेक विकास प्रकल्प रखडले आहेत. या जमिनी प्रामुख्यानं विदर्भात अधिक असून, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात खटला चालू आहे. या खटल्याच्या बाबतीत न्यायालयात पाठपुरावा करून, हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार," असंही बावनकुळे यांनी सांगितलं.

जनतेचे हेलपाटे कमी करू : "शेतकरी-शेतमजुरांशी संबंधित असणाऱ्या या खात्यात अनेक कायद्यांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. त्याचा अभ्यास करून राज्याच्या विकासाची गती वाढविण्यात येईल. कागदपत्रांशी निगडित नागरिकांची महसूल खात्याशी संबंधित अनेक कामं असतात. नागरिकांना या कामांसाठी तलाठी कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय ते शासनस्तरापर्यंत कमीत कमी हेलपाटे मारून काम कसं करता येईल, यासंबंधी लवकरच उपाययोजना आखू आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा देऊ. मुद्रांक शुल्क, जमाबंदी आयुक्त तसंच वाळूशी संबंधित धोरणांमध्ये सुलभीकरण करण्याचा तसंच वाळूमाफियांना पूर्णपणे पायबंद घालण्याचा माझा प्रयत्न आहे. धोरण प्रक्रियेत सुलभीकरण आणण्यासाठी इतर राज्यांतील उपयुक्त कायद्यांचाही अभ्यास करणार असून येत्या काळात महसूल विभागात सकारात्मक बदल आपल्याला पाहायला मिळतील, असं बावनकुळे म्हणालेत.

सरकारमध्ये योग्य समन्वय :"बहुपक्षीय सरकार समजुतीनं चालवावं लागतं, त्यासाठी समन्वय आवश्यक असतो. महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय असून, खातेवाटपामध्येही तो दिसून आला आहे. तसंच पालकमंत्रिपदांचं वाटप करतानाही कोणतीही कुरबूर न होता आमचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबरोबर योग्य समन्वय साधून पालकमंत्रिपदांचं वाटप करतील," असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

भुजबळ महायुतीतील महत्त्वाचे नेते : "छगन भुजबळ हे महायुतीतील महत्त्वाचे नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे त्यांच्या बाबतीत योग्य निर्णय घेतील," असंही बावनकुळे यांनी भुजबळ यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.

हेही वाचा

  1. राज ठाकरेंच्या भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू पुन्हा सहपरिवार एकत्र
  2. "समज नसल्यामुळं धर्माच्या नावाखाली छळ", मोहन भागवत असं का म्हणाले?
  3. मुंबईत पुन्हा हिट अँड रनचा प्रकार, वडाळ्यात चार वर्षीय मुलाचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details