सातारा : कराड दक्षिण मतदारसंघातील कोळेवाडी ग्रामपंचायतीनं सोमवारी (9 डिसेंबर) ग्रामसभेत ईव्हीएम विरोधात ठराव घेऊन बॅलेट पेपरवरच निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. ईव्हीएम विरोधात घेण्यात आलेला हा देशातील पहिला ठराव आहे. त्यामुळं ईव्हीएम विरोधात वातावरण वाढत चाललं आहे. कराड दक्षिणमध्ये 70 वर्षांनी काँग्रेस उमेदवाराचा पहिल्यांदाच पराभव झाला असून यंदा भाजपाचा उमेदवार निवडून आला आहे.
ईव्हीएममुळं संशयाचं वातावरण : कोळेवाडी ग्रामपंचायतीनं ईव्हीएम विरोधात ठराव घेताना यापुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवरच घेण्याची मागणी केली आहे. ईव्हीएममुळं मतदान प्रक्रियेवर संशयाचं वातावरण निर्माण होतंय, त्यामुळं आमचा ईव्हीएमवर विश्वास नाही. लोकशाहीच्या निकोप वाढीसाठी संशयविरहित मतदान आवश्यक असल्याच्या ग्रामस्थांच्या भावना आहेत.
बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी (Source - ETV Bharat Reporter) मतपत्रिकेवर कधीच नव्हता संशय :देशात संसदीय लोकशाही आहे, लोकशाहीत निवडणूक आणि मतदान ही संवैधानिक प्रक्रिया आहे. यापूर्वी मतपत्रिकेवर मतदान घेतलं जात होतं. त्यावेळी आत्ता सारखं संशयाचं वातावरण कधीच निर्माण झालं नव्हतं. ईव्हीएमवरील निवडणूक प्रक्रिया संशयाच्या फेऱ्यात अडकली आहे. हे लोकशाहीसाठी मारक आहे. वेळ खाऊ प्रक्रिया असली तरी पूर्वीप्रमाणे मतपत्रिकेवरच निवडणुका घ्याव्यात, असंही कोळेवाडी ग्रामपंचायतीनं ठरावात म्हटलं आहे.
बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी (Source - ETV Bharat Reporter) मतदानात काही तरी गडबड : आम्हीही ईव्हीएम मशीनवरच मतदान केलं आहे, पण झालेल्या मतदानात काही तरी गडबड असल्याचं आमचं ठाम मत आहे. त्यामुळं आमचा ईव्हीएमवरील मतदान पद्धतीवर विश्वास नाही. बॅलेट पेपरवरच मतदान घ्यावं, अशी कोळेवाडी ग्रामस्थांची मागणी आहे.
हेही वाचा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 'या' पुतळ्याला 74 वर्षे पूर्ण; स्मारक रखडलं, महापालिकेच्या ठरावालाही केराची टोपली
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कर्नाटक सरकारला सुनावलं; "मराठी भाषिकांसोबत..."
- विधानसभेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुगलबंदी; नाना पटोलेंवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा शाब्दिक प्रहार