पुणे Replica of Golden Temple :गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून विविध देखावे साकारले जातात. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील सदाशिव पेठेतील छत्रपती राजाराम मंडळाकडून यंदा अमृतसर येथील सुवर्ण मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. मात्र, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीनं (SGPC) याला विरोध केलाय. अमृतसर येथील शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे (SGPC) अध्यक्ष हरजिंदर सिंग धामी यांनी एक्सवर पोस्ट करत हे शीखांच्या भावना भडकवणारं कृत्य असल्याचं म्हटलय.
अमृतसर येथील भव्य सुवर्ण मंदिर पुण्यात! परंतु प्रतिकृतीला शीख समुदायाचा विरोध - Golden Temple Replica
Replica of Golden Temple : सदाशिव पेठेतील छत्रपती राजाराम मंडळाच्या वतीनं यंदा अमृतसर येथील सुवर्ण मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येत आहे. मात्र, या प्रतिकृतीला शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीकडून (SGPC) विरोध केला जात असल्याचं बघायला मिळतंय.
Published : Sep 5, 2024, 5:16 PM IST
|Updated : Sep 5, 2024, 5:37 PM IST
प्रतिकृतीची केली जाणार पाहणी : पुढं निंबाळकर म्हणाले, "शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे शिष्टमंडळ शुक्रवारी (6 सप्टेंबर) आम्ही तयार केलेल्या सुवर्ण मंदिराच्या प्रतिकृतीची पाहणी करतील. त्यानंतर त्यांनी सांगितलेल्या सूचनांचं आम्ही पालन करणार आहोत." दरम्यान, या अगोदर छत्रपती संभाजीनगर, उल्हासनगर तसंच कोलकाता येथे देखील सुवर्ण मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली होती. मात्र, तेव्हा त्यांना कोणीही विरोध केला नाही. मग आता पुण्यातील सुवर्ण मंदिराच्या देखाव्याला विरोध का केला जातोय? असा सवाल गणेशभक्तांकडून उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा -