महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तरुणानं लॉजवर नेऊन केला बलात्कार, हादरलेल्या पीडितेनं संपवलं जीवन; तर दुसऱ्या घटनेत नराधमानं दिव्यांग महिलेला केलं 'वासनेची शिकार' - Rape Victim Girl Commits Suicide - RAPE VICTIM GIRL COMMITS SUICIDE

Rape Victim Girl Commits Suicide : ओळखीच्या तरुणानं लॉजवर नेऊन बलात्कार केल्यानं हादरलेल्या पीडितेनं आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. तर दुसऱ्या एका घटनेत मद्यपी नराधमानं दिव्यांग महिलेवर अत्याचार केल्यानं मोठी खळबळ उडाली.

Rape Victim Girl Commits Suicide
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2024, 2:32 PM IST

Updated : Sep 5, 2024, 7:44 PM IST

चंद्रपूर Rape Victim Girl Commits Suicide : ओळखीच्या तरुणानं लॉजवर नेऊन अत्याचार केल्यानं हादरलेल्या पीडितेनं जीवन संपवल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही संतापजनक घटना बल्लारपुरात बुधवारी दुपारी घडली आहे. बलात्कारानं हादरलेल्या पीडितेनं जीवन संपवल्यानं नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणातील नराधम शिवम दिनेश दुपारे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर दुसऱ्या घटनेत एका दिव्यांग महिलेवर नराधमानं अत्याचार केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेतील नराधमानं मद्यपान करुन पीडितेवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चंदू बालू भुक्या या नराधमाला अटक केली आहे. एकाच दिवशी बल्लारपुरात दोन अत्याचाराच्या घटना घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी (ETV Bharat Reporter)

तरुणानं लॉजवर नेत केला अत्याचार :बल्लारपुरातील एका परिसरात राहत असलेल्या 17 वर्षाच्या अल्पवयीन पीडितेची नराधमाशी ओळख होती. मात्र या नराधमानं लॉजवर नेत अत्याचार केला, त्यामुळे पीडितेला मोठा धक्का बसला. या घटनेनंतर मानसिक धक्का बसलेल्या पीडितेनं आत्महत्या करुन बुधवारी दुपारी जीवन संपवलं. त्यामुळे बल्लारपुरात मोठी खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या आत्यानं पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मौलाना आझाद वॉर्डात राहणाऱ्या नराधम शिवम दिनेश दुपारे याच्यावर गुन्हा दाखल केली. पोलिसांनी तत्काळ या घटनेतील नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. या नराधमावर पोक्सो 4 (1) आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर लॉज मालक आणि मॅनेजर यांची चौकशी सुरू आहे.

दिव्यांग महिलेवर नराधमाचा अत्याचार :बल्लारपुरात आईसोबत राहणाऱ्या एका दिव्यांग महिलेवर मद्यपी नराधमानं अत्याचार केल्यानं मोठी खळबळ उडाली. ही महिला आपल्या आईसोबत बल्लारपुरातील एका परिसरात राहते. या प्रकरणातील पीडितेची आई एका हॉटेलमध्ये काम करते. त्या सकाळी कामाला जाऊन रात्री घरी परत येतात. त्यामुळे घरात दिव्यांग महिला घरात एकटीच राहते. नराधम चंदू बालू भुक्या हा पीडिता राहत असलेल्या घरमालकाच्या ओळखीचा आहे. त्यानं पीडितेच्या घरात एकटीच असल्याची संधी साधून पीडितेवर अत्याचार केला. ही घटना घरमालकाच्या लक्षात येताच त्यांनी पीडितेची आई घरी आल्यानंतर ही घटना त्यांना सांगितली. त्यावरुन त्यांनी नराधमाविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी चंदू बालू भुक्या याला अटक केली आहे. नराधम चंदू बालू भुक्या याच्याविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनिल गाडे यांनी दिली आहे. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक साखरे यांनीही घटनास्थळावर भेट दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वर्षा नैताम, पोलीस उपनिरीक्षक गोविंद चाटे हे करत आहेत.

हेही वाचा :

  1. अंगात भूत असल्याचं सांगत भोंदूबाबानं केला आई, मुलगी, मामी आणि आजीवर बलात्कार, कोर्टानं सुनावली 'ही' शिक्षा - Nagpur Bhondubaba Rape Case
  2. धक्कादायक! शाळकरी मुलीला दारू पाजून बलात्कार, अल्पवयीनांसह मैत्रिणीविरुद्ध गुन्हा दाखल - Rape Of Minor Girl
  3. बदलापूर पाठोपाठ मुंबईत आठ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार - Molestation
Last Updated : Sep 5, 2024, 7:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details